नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कापसाकडे कानाडोळा

येवला :लाल्या अन बोंड अळीचा प्रादुर्भाव, वेचणीला मजूरांचा तुडवडा आदी कारणांमुळे कपाशीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातच मका, सोयाबीन अन कांद्याचा पर्याय मिळाल्याने कपाशीचे क्षेत्र कमी होत असल्याचे चित्र आहे.
 Farmers in Nashik district turn a blind eye to cotton
Farmers in Nashik district turn a blind eye to cotton

येवला : खान्देश अन मराठवाड्याच्या पीक पॅटर्नचे अनुकरण करत दोन दशकापासून जिल्ह्यात कापसाचे पीक आले आणि वाढलेही. मात्र दोन वर्षांपासून भावाचा झालेला वांदा, लाल्या अन बोंड अळीचा प्रादुर्भाव, वेचणीला मजूरांचा तुडवडा आदी कारणांमुळे कपाशीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातच मका, सोयाबीन अन कांद्याचा पर्याय मिळाल्याने कपाशीचे क्षेत्र कमी होत असल्याचे चित्र आहे.

मालेगाव,नांदगाव,येवला या तीन तालुक्यातच सर्वाधिक कापूस लागवड होते. चार-पाच वर्षापूर्वी जिल्ह्याचे क्षेत्र ४२ ते ४५ हजाराच्या आसपास लागवडीखाली गुंतवले जात होते. मात्र दोन वर्षांपासून यात मोठी घट होत आहे. यावर्षी तर ४० हजार ३२२ हेक्‍टरवर पेरणी अपेक्षित असताना ३८ हजार २२७ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. बागलान व सटाण्यात काहिसे क्षेत्र वाढले आहे.

मागील वर्षी सुरुवातीला सहा हजाराच्या आसपास दर मिळाला मात्र शेतकऱ्यांचा कापूस येताच हा दर ५ ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान स्थिरावला होता. या वर्षी केंद्र शासनाने ५ हजार ५१५ रुपयाचा हमीभाव जाहीर केला खरा मात्र होणारा खर्च पाहता हा भावही परवडणारा नसल्याचे शेतकरी सांगतात. सरासरी ६ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला तरच कापूस परवडतो असेही शेतकरी सांगतात.

रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणीसह मशागतीचा खर्च वाढला आहे. त्यात मजुरांची अडचण अन कपाशीला मका, कांद्याचा उत्तम पर्यायही मिळाला आहे. या कारणांमुळे कपाशीचे क्षेत्रात १० ते १५ टक्के घट झालेली दिसते. - अशोक कुळधर, कृषी अभ्यासक, सायगाव.

क्षेत्र घटण्याचे कारणे

  • लाल्या रोगासह बोंड अळी वाढली 
  •     फवारणीवर वाढलेला खर्च 
  •     रोजदार टंचाई अन मजुरी 
  •     वर्षभरात एकच पीक  
  •     कांदा, मका, सोयाबीनचा पर्याय   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com