Agriculture news in marathi, Farmers need to be self-sufficient in seeds: Dr. Dhawan | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी करणे गरजेचे : डॉ. ढवण

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत स्वावलंबी करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यापीठही मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादन करत आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी निविष्ठा तयार करून त्यांची विक्री व्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत स्वावलंबी करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यापीठही मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादन करत आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी निविष्ठा तयार करून त्यांची विक्री व्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबाद येथे रब्बी हंगामासाठीची ७० वी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी (ता. ८) झाली. वनामकृविचे संचालक संशोधन डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर, औरंगाबाद, लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. 

डॉ. ढवण म्हणाले, ‘‘येणाऱ्या विविध आव्हानांचा अभ्यास करून विद्यापीठ संशोधन व विस्‍तार कार्य अखंडपणे कार्यरत आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याची गरज आहे.’’  

डॉ. वासकर म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या बायोमिक्स, ट्रायकोकार्ड यांचे संशोधन करून युनिट सुरू करण्यात आले. ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. परभणी येथील ज्वारी संशोधन केंद्र येथे ट्रायकोबुस्टची देखील निर्मिती करण्यात येणार आहे. येत्या काळात परभणी येथे ज्वारी महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. ज्यामध्ये ज्वारीचे विविध वाण तसेच ज्वारीची प्रक्रिया उद्योग या विषयी मार्गदर्शन होईल. विद्यापीठ सोयाबीनचे उन्हाळी उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेत आहे. ज्यामध्ये विद्यापीठ देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.’’ 

डॉ. देवसरकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी करडई, जवस, सूर्यफूल या पिकाकडे वळावे. या पिकांचे विद्यापीठ विकसित खूप चांगले वाणही उपलब्ध आहे. त्यांचे बियाणे देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. हरभरा या पिकांमध्ये बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर ही अत्यंत फायदेशीर आहे. विविध शिफारशित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करून कडधान्य, तेलबिया इत्यादी पिकांचे उत्पादन वाढवावे.’’

एनएआरपी औरंगाबादद्वारे विकसित ट्रायकोकार्ड, केव्हीके औरंगाबादद्वारे विकसित हळद पावडर, मिरची पावडर, आवळा कँडी इत्यादी उत्पादनांचे अनावरण करण्यात आले.
 


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...