पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात प्रचंड गर्दी
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात प्रचंड गर्दी

पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात प्रचंड गर्दी

ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस नुकसानीच्या पूर्वसूचना देण्यासाठी गुरुवारी (ता.१६) शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालयात मोठी गर्दी केली. त्यामुळे कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते, कार्यालयाकडे जाणारा रस्ताही काही काळ बंद झाला होता.

निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस नुकसानीच्या पूर्वसूचना देण्यासाठी गुरुवारी (ता.१६) शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालयात मोठी गर्दी केली. त्यामुळे कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते, कार्यालयाकडे जाणारा रस्ताही काही काळ बंद झाला होता.  जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद व मूग या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा दोन टप्प्यांमध्ये पेरणी झाली असली, तरी मागील काही महिन्यांत पाऊस नसल्यामुळे पिके संकटात आली होती. तर काही पिके अतिवृष्टीमुळे गेली आहेत. याबाबत तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानभरपाई मिळावी म्हणून ऑनलाइन पूर्वसूचना दाखल केल्या, ज्यांना विविध कारणांमुळे पूर्वसूचना दाखल करता आली नाही, त्या शेतकऱ्यांनी ऑफलाइन पूर्वसूचना दाखल करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाकडे धाव घेतली.  सप्टेंबरमध्ये झालेल्या पीक नुकसानीची विमा कंपनीस ऑफलाइन पद्धतीने पूर्वसूचना देण्याची गुरुवारी (ता. १६) शेवटची तारीख होती. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवाय ग्रामीण भागातील आलेल्या शेतकऱ्यांच्या मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला लावण्यात आल्याने वाहतुकीस मोठा खोळंबा झाला होता. पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांच्या गाड्यांची हवा सोडल्याने शेतकऱ्यांना आपल्या गाड्या ओढत आणाव्या लागल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com