agriculture news in marathi Farmers from Nilanga taluka rushes to entry their crop damage to Insurance Company | Page 2 ||| Agrowon

पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात प्रचंड गर्दी

वृत्तसेवा
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021

ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस नुकसानीच्या पूर्वसूचना देण्यासाठी गुरुवारी (ता.१६) शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालयात मोठी गर्दी केली. त्यामुळे कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते, कार्यालयाकडे जाणारा रस्ताही काही काळ बंद झाला होता. 
 

निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस नुकसानीच्या पूर्वसूचना देण्यासाठी गुरुवारी (ता.१६) शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालयात मोठी गर्दी केली. त्यामुळे कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते, कार्यालयाकडे जाणारा रस्ताही काही काळ बंद झाला होता. 

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद व मूग या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा दोन टप्प्यांमध्ये पेरणी झाली असली, तरी मागील काही महिन्यांत पाऊस नसल्यामुळे पिके संकटात आली होती. तर काही पिके अतिवृष्टीमुळे गेली आहेत. याबाबत तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानभरपाई मिळावी म्हणून ऑनलाइन पूर्वसूचना दाखल केल्या, ज्यांना विविध कारणांमुळे पूर्वसूचना दाखल करता आली नाही, त्या शेतकऱ्यांनी ऑफलाइन पूर्वसूचना दाखल करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाकडे धाव घेतली. 

सप्टेंबरमध्ये झालेल्या पीक नुकसानीची विमा कंपनीस ऑफलाइन पद्धतीने पूर्वसूचना देण्याची गुरुवारी (ता. १६) शेवटची तारीख होती. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवाय ग्रामीण भागातील आलेल्या शेतकऱ्यांच्या मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला लावण्यात आल्याने वाहतुकीस मोठा खोळंबा झाला होता. पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांच्या गाड्यांची हवा सोडल्याने शेतकऱ्यांना आपल्या गाड्या ओढत आणाव्या लागल्या.


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...