Agriculture news in marathi Farmers in Niphad taluka deprived of rabbi insurance | Agrowon

निफाड तालुक्यातील शेतकरी रब्बीच्या विम्यापासून वंचित

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी मंडळातील शेतकऱ्यांनी रब्बी २०१९-२० च्या हंगामात गहू, कांदा व द्राक्ष पिकांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला.

नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी मंडळातील शेतकऱ्यांनी रब्बी २०१९-२० च्या हंगामात गहू, कांदा व द्राक्ष पिकांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला. मात्र, मार्चमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने येथील पिके आडवी झाली. शासन स्तरावरून पंचनामे होऊन अहवाल कंपनीला पाठविण्यात आले. मात्र, त्याचा परतावा अद्याप न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

तालुक्यातील चांदोरी महसूल मंडळातील चितेगाव, नारायणगाव, चेहडी खुर्द या तीन गावातील ३६ शेतकऱ्यांनी गहू व कांदा पिकासाठी, तर ५ शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांचा विमा उतरविला होता. त्यापोटी अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने भरपाई कमी दिल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर, फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून अद्याप विम्याची रक्कम भेटलेली नाही. त्याबाबत उत्तर कुठलीही यंत्रणा देत नसल्याची स्थिती आहे.  

नुकसान झाल्यानंतर टाळेबंदी असताना संबंधित कंपन्यांना कळविण्यात आले. काढणीवेळी कोरोनाच्या वातावरणात टाळेबंदी असताना कंपनीकडे पाठपुरावा करूनही विमा प्रतिनिधींनी पीक पाहणी केली नाही. अखेर शासन स्तरावरून नुकसानीचा अहवाल संबंधित कंपन्यांना पाठविण्यात आला. मात्र कंपनी शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी प्रतिसाद देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. 

पंचनामे केल्यानंतर संबंधित कंपनीला पत्र पाठवून पाठपुरावा केला नाही. याबाबत कंपनीने भरपाई देण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पाठपुरावा सुरू आहे.
- बी. जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड.

अवकळी पावसाने नुकसान झाले. त्यात टाळेबंदीमुळे बाजार भाव कमी झाले. विमा कंपनीने भरपाई कमी दिली आहे. त्यामुळे लाभ हवा तसा मिळाला नाही.
- विठ्ठल पिंगळे, द्राक्ष बागायतदार, चितेगाव, ता. निफाड

अवकाळी पाऊस मार्च महिन्यात झाला. त्याच वेळी टाळे बंदीच्या काळात विमा कंपनी प्रतिनिधी प्रतिसाद देत नव्हते. मात्र, शासनाने पंचनामे करूनही अद्याप भरपाई मिळाली नाही. ती तातडीने द्यावी.
- सचिन भोज, गहू उत्पादक शेतकरी, चितेगाव, ता. निफाड.
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...