पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शनिवारी (ता. १४) मुलाखती होणार आहे.
ताज्या घडामोडी
जालना जिल्ह्यात खरेदी केंद्रांना मिळेना शेतकऱ्यांचा प्रतिसाद
जालना : जिल्ह्यातील सोयाबीन, मूग, उडीद, मक्याची हमीदराने खरेदी करण्यासाठी पाच केंद्रे सुरू करण्यात आली. परंतु त्याला प्रतिसाद नसल्याचीच स्थिती जिल्ह्यात आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला किमान आधारभूत किमतीनुसार दर मिळावा म्हणून जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडदाच्या खरेदीसाठी जालना, अंबड, तिर्थपुरी, मंठा व भोकरदन या पाच ठिकाणी हमीदर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. त्यासाठी नोंदणी व खरेदीकरिता १५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. परंतु या हमीदर खरेदी केंद्रांवर शेतमाल खरेदीला प्रतिसादच नसल्याची स्थिती आहे.

सोयाबीनसाठी जालना केंद्रावर १५, अंबड ५, तिर्थपुरी ११ मिळून जवळपास ३१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. जालना केंद्रावरील शेतकऱ्यांना एसएमएसही पाठविण्यात आले. परंतु हमीदराने सोयाबीन विक्रीसाठी कुणीही स्वारस्य दाखविले नाही. मुगासाठी जालना केंद्रावर ६८ शेतकऱ्यांनी; तर अंबडच्या केंद्रावर २, तिर्थपुरी ३ मिळून ७३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. प्रत्यक्षात एसएमएस पाठविल्यानंतरही कुणी खरेदीसाठी फिरकले नाही. उडदासाठी तर केवळ जालना केंद्रावरच ३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. प्रत्यक्षात खरेदीसाठी मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याचे मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी सांगितले.
मका खरेदीसाठी पाच केंद्रे
जालना, अंबड, तिर्थपुरी, मंठा व भोकरदन याच पाच केंद्रांवरून मक्याची हमीदराने खरेदी केली जाणार आहे. १ नोव्हेंबरपासून त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु अजूनही शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी प्रतिसाद दिला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात औरंगाबादपाठोपाठ मक्याचे क्षेत्र आहे. यंदा मक्याचे पावसाने मोठे नुकसान केले. त्यात मका खरेदीसाठी आर्द्रता, स्वच्छता, फूट आदीविषयींचे नियम पाहता हमीदराने मका खरेदीला प्रतिसाद मिळतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.