नांदेड, परभणी, हिंगोलीत हमीभाव खरेदीसाठी नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

Farmers not interested for registration for guarantee purchase in Nanded, Parbhani, Hingoli districts
Farmers not interested for registration for guarantee purchase in Nanded, Parbhani, Hingoli districts

नांदेड : किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत यंदा मूग, उडीद, सोयाबीन या शेतमालाच्या खरेदीसाठी नोंदणी करण्याकरिता १५ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. मात्र, यंदा अनेकवेळा मुदतवाढ देऊनही नोंदणीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या दहा दिवसांत ५४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यामुळे एकूण नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ६ हजार ८४ एवढी झाली आहे. सोमवार (ता. २५) पर्यंत या तीन जिल्ह्यांतील ४३० शेतकऱ्यांच्या २ हजार ११४.५ क्विंटल मुगाची खरेदी झाली. उडीद, सोयाबीन खरेदी झालेली नाही.

पावसात भिजल्याने डागील झालेले सोयाबीन शासकीय खरेदीच्या निकषात बसत नाही. त्यामुळे दीड ते दोन हजार रुपये क्विंटलने खुल्या बाजारात विक्री करावी लागत आहे. चांगल्या सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे शासकीय खरेदीस प्रतिसाद मिळत नाही.

नांदेड जिल्ह्यात जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयअंतर्गत नाफेडच्या नांदेड (अर्धापूर), मुखेड, हदगाव, किनवट या केंद्रांवर मिळून एकूण ४३६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मुखेड येथे २८ शेतकऱ्यांचा १२५ क्विंटल मूग खरेदी करण्यात आली. अन्य शेतमालाची खरेदी झालेली नाही. विदर्भ को. मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ५३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

परभणी जिल्ह्यातील नाफेडच्या परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा येथील केंद्रांवर सोमवार (ता. २५) पर्यंत मूग, उडीद, सोयाबीनसाठी एकूण १ हजार ४२० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. एकूण २३२ शेतकऱ्यांची १ हजार २५३ क्विंटल मूग खरेदी करण्यात आला. विदर्भ को-मार्केटिंग फेडरेशनच्या मानवत आणि गंगाखेड येथील केंद्रांवर मूग आणि सोयाबीनसाठी एकूण १ हजार ३७२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ७७ शेतकऱ्यांचा ४८३.५० क्विंटल मूग खरेदी करण्यात आला.

ऑनलाइन नोंदणी केलेली शेतकरी संख्या

जिल्हा   मूग  उडीद सोयाबीन
नांदेड १७५  २४ २९०
परभणी २०३६ ७४८
हिंगोली ८०९ ३७० १६२२

मूग खरेदी (क्विंटलमध्ये )

जिल्हा शेतकरी संख्या मूग खरेदी
नांदेड २८ १२५
परभणी ३०९ १७३६.५०
हिंगोली ९३ २५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com