शेतकरी खरेदी केंद्रात तूर विकेना

शेतकरी खरेदी केंद्रात तूर विकेना
शेतकरी खरेदी केंद्रात तूर विकेना

जळगाव : खानदेशात तूर खरेदीसाठी मागील आठवड्यात शासकीय केंद्रांमध्ये नोंदणी सुरू झाली. परंतु नोंदणीला अजूनही प्रतिसाद मिळाला नाही. तिची मुदत संपण्यास फक्त ११ दिवस राहिले आहेत. पुढे प्रतिसाद मिळण्याविषयी साशंकता निर्माण होत आहे.

जळगाव जिल्ह्यात नऊ, धुळ्यात तीन आणि नंदुरबारात तीन तूर खरेदी केंद्रे मंजूर आहेत. जळगावात पाचोरा, चाळीसगाव, जळगाव, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, चोपडा, रावेर, यावल येथे तूर खरेदी केंद्र मंजूर आहेत. धुळ्यात शिरपूर, धुळे, नंदुरबारात शहादा, नंदुरबार येथे तूर खरेदी केंद्र मंजूर आहेत. २३ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करून घ्यायची आहे. ती संबंधित तूर खरेदीसाठी सबएजंट म्हणून नियुक्त केलेल्या संस्थेत करण्याची सुविधा मार्केटिंग फेडरेशनने उपलब्ध केली आहे. परंतु तूर खरेदीला जळगावसह धुळे, नंदुरबारात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात जळगाव व पाचोरा येथे अनुक्रमे कृषी औद्योगिक बहुउद्देशीय संस्था व भडगाव शेतकरी सहकारी संघाला सबएजंट म्हणून खरेदीसंबंधी नियुक्त केले. इतर सात ठिकाणी संबंधित तालुक्‍यांच्या शेतकरी सहकारी संघांची नियुक्ती झाली आहे. संबंधित संघांमध्ये मागील आठवड्यातच नोंदणी सुरू झाली. त्यासाठी डिजिटल सातबारा आवश्‍यक आहे. तसेच आधार कार्ड व बॅंकेच्या पासबुकची झेरॉक्‍स आवश्‍यक आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यात अद्याप प्रतिसाद नाही.

जिल्ह्यात सुमारे १८०० हेक्‍टरवर तूर लागवड झाल्याचा अंदाज होता, परंतु दुष्काळामुळे कोरडवाहू क्षेत्राचे आतोनात नुकसान झाले. शेतकरी बागायती तुरीची विक्री दर बऱ्यापैकी असल्याने बाजारात करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com