agriculture news in Marathi farmers not responding to tur registration Maharashtra | Page 2 ||| Agrowon

तुरीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

नागपूर ः खरेदीनंतर चुकाऱ्यास होणारा विलंब आणि हेक्‍टरी खरेदीची मर्यादा त्यासोबतच इतर प्रशासकीय प्रक्रियेमुळे जेरीस आलेल्या  शेतकऱ्यांनी यावर्षी शासकीय तूर खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यातूनच रामटेक तालुक्‍यात ऑनलाइन नोंदणीला एकाही शेतकऱ्याचा प्रतिसाद मिळाला नाही. 

नागपूर ः खरेदीनंतर चुकाऱ्यास होणारा विलंब आणि हेक्‍टरी खरेदीची मर्यादा त्यासोबतच इतर प्रशासकीय प्रक्रियेमुळे जेरीस आलेल्या  शेतकऱ्यांनी यावर्षी शासकीय तूर खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यातूनच रामटेक तालुक्‍यात ऑनलाइन नोंदणीला एकाही शेतकऱ्याचा प्रतिसाद मिळाला नाही. 

केंद्र सरकारने यावर्षी तुरीला ५८०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. त्याकरिता ऑनलाइन नोंदणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. त्याकरिता सुरुवातीला शनिवार (ता.१५) पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु रामटेक तालुक्‍यात या तारखेपर्यंत एकाही शेतकऱ्यांकडून नोंदणीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शासनाने १५ मार्चपर्यंत नोंदणीला मुदतवाढ दिली असली तरी यापुढील काळात देखील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमीच असल्याचे सांगितले जाते. 

यावर्षी मॉन्सूनोत्तर तसेच अवकाळी पावसाने पिकाची प्रत खालावली. त्यामुळे शासकीय केंद्रावर आपल्या तुरीची खरेदी होईल किंवा नाही याबाबत शेतकरी साशंक आहेत. त्यासोबतच गेल्यावर्षी तूर शासनाला विकल्यानंतर चुकाऱ्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागली होती. त्यामुळे देखील शेतकरी शासनाला तूर विकण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे.

त्यामुळे यापुढील काळात देखील नोंदणीला प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. तुरीला यावर्षी ५८०० रुपयांचा हमीभाव असला तरी बाजारात तुरीचे व्यवहार ४५०० ते ५००० रुपये क्‍विंटलनेच होत आहेत. पैसे तत्काळ मिळत असल्याने  नुकसान सोसूनही शेतकरी व्यापाऱ्यांनाच तूर विकत आहेत. 

नोंदणी प्रक्रिया त्रासदायक
तुरीची विक्री करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया देखील त्रासदायक आहे. जिल्ह्याकरिता हेक्‍टरी उत्पादकता निश्‍चीत करण्यात आली आहे. त्यामुळे सातबाऱ्यावर नोंदणी असलेल्या क्षेत्राइतकीच तूर विकता येईल. नोंदणी करताना पेरापत्र, आधारकार्ड, बॅंक पासबुक झेरॉक्‍स असे कागदपत्रही लागणार आहेत. त्यामुळे देखील शेतकरी शासनाला तूर देण्यास इच्छुक नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
भारत - इस्राईल मैत्रीतून उजळणार...भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून...
राज्य अंधारात जाण्याचा धोकाः डॉ. नितीन...मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.५...
चारशे वर्षात पहिल्यांदाच वारकऱ्यांविना...सोलापूर ः सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेल्या...
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...
कांदा विक्रीसाठी ‘पणन’चे प्रयत्नपुणे: कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी...
दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई...वर्धा ः  दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्या दूध...
पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे...मुंबई: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
मोसंबी मागणीअभावी बागेतचऔरंगाबाद: परिपक्व झालेल्या मोसंबीच्या मृग...
लॉकडाऊनमुळे ‘निविष्टा’ कंपन्यांची उधारी...पुणे: लॉकडाऊनमुळे राज्यातील खते, बियाणे व कीडनाशक...
तीन दिवसांत एक हजार वीस टन द्राक्ष ...पुणे ः कोरोना विषाणूमुळे राज्यातील द्राक्ष...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने...