agriculture news in marathi Farmers online for crop loans Demand: Collector Chaudhary | Agrowon

शेतकऱ्यांनो पीक कर्जासाठी ऑनलाइन मागणी करा ः जिल्हाधिकारी चौधरी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 मे 2020

औरंगाबाद : ‘‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या गर्दीचे नियमन करण्यासाठी जिल्हयातील पीक कर्जासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी http://KCC.setuonline.com/ या संकेतस्थळावरील ऑनलाईन अर्ज भरुन पीक कर्जाची मागणी नोंदवावी’’, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. 

औरंगाबाद : ‘‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या गर्दीचे नियमन करण्यासाठी जिल्हयातील पीक कर्जासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी http://KCC.setuonline.com/ या संकेतस्थळावरील ऑनलाईन अर्ज भरुन पीक कर्जाची मागणी नोंदवावी’’, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. 

चौधरी म्हणाले, ‘‘ही लिंक aurangabad.nic.in या संकेत स्थळावर देखील उपलब्ध आहे. खरिपासाठी जिल्हयात बँकातर्फे पीक कर्ज वाटप सुरू आहे. सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेता यावा, ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे. परंतु, त्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळाला नव्हता, अशा सर्व शेतकऱ्यांना या पोर्टलद्वारे या योजनेचा लाभ घेता येईल. या लिंकव्दारे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बैंक, औरंगाबादतर्फे संबंधित बँकेकडे पाठविण्यात येतील. एका आधारकार्ड धारकास एका बँकेतच पीक कर्ज मागणी करता येईल. 

आपल्या नजीकच्या बँक शाखेची निवड करावी. यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पात्र शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात येतील. संदेश प्राप्तीनंतर शेतकऱ्यांनी बॅंकेने दिलेल्या तारखेस त्यांचे आधारकार्ड , ७/१२ , ८. अ , फेरफार नक्कल , पॅनकार्ड , टोचनकाशा , पासपोर्ट साईज २ फोटो , पास बुक या कागदपत्रासह बैंकेत उपस्थित राहावे. अंतिम पीक कर्ज मंजुरी किंवा नामंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल. सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण व जिल्हा बँकेच्या सर्व जिल्हा समन्वयकांनी व शाखाधिकाऱ्यांनी नोंदणीकृत शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्याकडून प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले. 

इच्छुक शेतकऱ्यांनी पीक कर्ज मागणी नोंदणी करावी. काही अडचण आल्यास आपल्या जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधावा. 
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...