agriculture news in marathi farmers opposes News farm bills in Farmers Parliament | Agrowon

‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोल

वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जुलै 2021

जंतर-मंतर येथे संयुक्त किसान मोर्चाद्वारा आयोजित ऐतिहासिक ‘शेतकरी संसदे’त केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पुन्हा हल्लाबोल करण्यात आला.

नवी दिल्ली  : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान मोर्चाद्वारा आयोजित ऐतिहासिक ‘शेतकरी संसदे’त केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पुन्हा हल्लाबोल करण्यात आला. कायद्यांतील जाचक तरतुदींवर चर्चा करून तीनही कृषी कायदे मागे घेण्याच्या भूमिकेवर निर्धार व्यक्त करण्यात आला. 

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या आठ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारकडून याविषयी पाच महिन्यांपासून संवादही नाही. अशातच संसदेचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्या संयुक्त किसान मोर्चाने ‘शेतकरी संसद’चे गुरुवार (ता.२२)पासून जंतर-मंतर येथे आयोजन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल, राकेश टिकैत, योगेंद्र यादव आदी उपस्थित होते.  

दररोज दोनशे शेतकरी सरकारविरोधी निदर्शने केल्यानंतर येथे ‘शेतकरी संसद’ होणार आहे. संसदेचे अधिवेशन संपेपर्यंत हे आंदोलन शांततामय मार्गाने सुरू राहणार आहे. आंदोलनाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी असणार आहे, असे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान गुरुवारी पोलिसांनी काही ठिकाणी चौकशी, तपासणीच्या नावाखाली मोर्चा अडविल्यानंतर शेतकरी संतप्त झाले होते. पोलिसांनी मात्र चोख बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान, संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या या शेतकरी संसदस्थळी भेट देण्याकरिता केरळातील काँग्रेसचे २० खासदार आले होते. 

पहिला ठराव...
‘शेतकरी संसदे’चे वार्तांकन करण्यास दिल्ली पोिलसांनी माध्यमांना मज्जाव केल्यानंतर, येथील चर्चेचे वार्तांकन करण्यासाठी माध्यम प्रतिनिधींना पोलिसांनी परवानगी द्यावी, असा पहिला ठराव या वेळी करण्यात आला. माध्यमांना प्रतिबंध केल्यावरून केंद्र सरकारवर येथे टीकाही केली गेली.


इतर अॅग्रो विशेष
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...