agriculture news in Marathi farmers opposing agriculture bills Maharashtra | Agrowon

कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर

वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरून पंजाब आणि हरियानाच्या शेतकऱ्यांमधील असंतोष वाढत चालला असून बुधवारी (ता.२३) हजारो शेतकरी विविध ठिकाणी रस्त्यांवर उतरले होते.

चंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरून पंजाब आणि हरियानाच्या शेतकऱ्यांमधील असंतोष वाढत चालला असून बुधवारी (ता.२३) हजारो शेतकरी विविध ठिकाणी रस्त्यांवर उतरले होते. हरियानाच्या पानिपतमधून दिल्लीच्या दिशेने कूच करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी पाण्याचे फवारेही मारण्यात आले. काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले.

सरकारने मंजूर केलेली कृषी विधेयके ही शेतकऱ्यांसाठी डेथ वॉरंट ठरणार असून कोणत्याही स्थितीमध्ये आम्ही ते सहन करणार नाही. याआधी जे मिळत होते त्यावर आम्ही खूष होतो सरकारने अतिरिक्त देण्याचा प्रयत्न करू नये. शेतकऱ्यांची जमीन अदानी आणि अंबानीला विकण्याचा कट सरकारने आखला असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. सरकारी विधेयकांचा निषेध करण्यासाठी भारतीय किसान युनियन आणि भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती यांनी २५ सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.

पश्‍चिम बंगालमध्येही आंदोलन
पंजाब, हरियाना, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड पाठोपाठ पश्‍चिम बंगालमधील शेतकरीही कृषी विधेयकांना विरोध करत आहेत. बुधवारी पश्‍चिम बंगालमधील शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी आंदोलने केली. पश्‍चिम बंगाल सरकारने संसदेतच कृषी विधेयकांना विरोध केला आहे. तसचे मागील काही दिवसांपासून राज्यात आंदोलने सुरु आहेत. बुधवारी मात्र या आंदोलनाची तीव्रता वाढली होती.

संघटनांची भूमिका
किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले की, ‘‘सरकारच्या या विधेयकांविरोधात धरणे आणि चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. उत्तरप्रदेशात देखील प्रत्येक गावामध्ये हे आंदोलन होणार आहे.’’ या संघटनेचे सरचिटणीस धर्मेंद्र मलिक यांनी आम्ही शेतकऱ्यांची लढाई लढू. या विधेयकांच्या माध्यमातून सरकार देशामध्ये कंपनीराज आणू पाहत आहे असे सांगितले.

प्रतिक्रिया
शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये भाजप नेत्यांच्या घराबाहेर चक्काजाम आंदोलन करावे. शेतकरी हिताची त्यांना एवढी चिंता असेल तर त्यांनी भाजपसोबतचे नाते देखील तोडावे.
- कॅ. अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री पंजाब


इतर अॅग्रो विशेष
मोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...
देखो तो कहीं चुनाव है क्या?‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...
कंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...
इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...
एक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...
कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...
फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...
द्राक्ष निर्यातदार, पॅकहाउसवरील निलंबन...नाशिक: नाशिकमधून गेलेल्या ४१ कंटेनरमध्ये कीड...
हातचं सारं गेलं, आता जगावं कसं?नाशिक : यंदा वेळेवर पाऊस नसल्याने भाताची रोपे...
धानाच्या हमीभावात ११ वर्षांत केवळ एक...भंडारा: व्यवस्थापन खर्चात दरवर्षी होणारी वाढ,...
राज्यात उन्हाची तीव्रता वाढली पुणे ः राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली...
कांदा लिलाव सुरू करण्याचे आदेशनाशिक : जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये...
सर्वांगीण विकासातून गुंडेगावचा झाला...गुंडेगाव (ता. जि. नांदेड) या गावाने शेती,...
कृषी उद्योजकतेची ‘एबीसी’सन २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ...
आयकर भरणाऱ्या ६५१ शेतकऱ्यांना नोटिसाशहादा, जि. नंदुरबार : आयकर भरत असूनही केंद्र...
कांद्याची कोट्यवधीची उलाढाल ठप्प नाशिक: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या दरावर...
करार शेतीची जबाबदारी कृषी विभागाकडेचपुणे: करारशेतीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर...
मॉन्सूनने घेतला देशातून निरोपपुणे ः परतीच्या पावसाला देशातून माघार घेण्यासाठी...