उस्मानाबादमधील शेतकऱ्यांना रेशीम शेतीचा आधार

जिल्हा सततचा दुष्काळ, गडगडलेले दर, मजुरी व वाढता उत्पादन खर्च या समस्यांनी ग्रासला आहे. अशा वेळी इथे रेशमाचे धागे आता घट्ट बनले असून, शेतकऱ्यांना रेशीम शेतीने चांगला आधार व साथ दिली आहे.
उस्मानाबादमधील शेतकऱ्यांना  रेशीम शेतीतून फायदा To the farmers in Osmanabad Benefit from silk farming
उस्मानाबादमधील शेतकऱ्यांना  रेशीम शेतीतून फायदा To the farmers in Osmanabad Benefit from silk farming

नायगाव, जि. उस्मानाबाद : ऊस, सोयाबीन, फळबागा यासाठी प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबाद जिल्हा सततचा दुष्काळ, गडगडलेले दर, मजुरी व वाढता उत्पादन खर्च या समस्यांनी ग्रासला आहे. अशा वेळी इथे रेशमाचे धागे आता घट्ट बनले असून, शेतकऱ्यांना रेशीम शेतीने चांगला आधार व साथ दिली आहे. 

येत्या काळात रेशीम शेतीही उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव घेतल्यास आश्चर्य वाटू नये. पूर्वी जिल्ह्यात जवळपास पंधराशे एकरावर रेशीम तुतीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. तर २०२१ मध्ये जवळपास ५६० शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. सुधारित तंत्रज्ञान, प्रशिक्षण, अनुदान यांच्या आधारे शेतकरी चांगल्या दर्जाचे रेशीम कोष तयार करू लागला आहे. वर्षाला सुमारे चार बॅचेस व प्रति बॅच सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांचे उत्पन्न गृहीत धरले तरी या शेतीतून शेतकऱ्यांचे अर्थकारण सक्षम व शाश्वत होत आहे. सद्यःस्थितीत शेतीतील विविध समस्यांनी शेतकरी त्रस्त झाला आहे. पाऊस बेभरवशाचा झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना हुकमी पर्याय शोधत आहेत. सध्या जिल्ह्याची मागासलेली ओळख पुसून उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी यातूनच शाश्वत उत्पन्नाचा मार्ग म्हणून रेशीम उद्योगाचा पर्याय निवडला आहे.  

कळंब तालुका अग्रेसर  रेशीम तुती लागवडीत जिल्ह्यातील निम्मा वाटा कळंब तालुक्याचा आहे. रेशीमचे कोठार म्हणून कळंब तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. तालुक्यात जवळपास आठशे एकरावर या पूर्वी रेशीम तुतीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. पुढील वर्षासाठी ३०० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचे लागवडीसाठी नाव नोंदणी केली आहे.

रेशीम शेती का भावते शेतकऱ्यांना? बेभरवशाचे हवामान व शेतमालाचे दर यांच्यापेक्षा रेशीम शेती शेतकऱ्यांना शाश्वत वाटत आहे. नेटके व्यवस्थापन, हवामान अनुकूल दर मिळाल्यास प्रति बॅच अगदी ५० हजारांच्या दरम्यानही उत्पन्न देण्याची क्षमता तुतीची आहे. शिवाय एकदा लागवड केली की ती १५ वर्षांपर्यंत टिकते. तसेच रोग, किडींचा फार मोठा प्रादुर्भाव होत नसल्याने फवारणींची गरज अधिकची पडत नाही. तसेच उत्पादन खर्चाच्या तुलनेत रेशीम कोषांना दर चांगला मिळतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com