परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचा यंदा गहू पेरणीवर जोर

Farmers in Parbhani district emphasize on sowing wheat this year
Farmers in Parbhani district emphasize on sowing wheat this year

परभणी : जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा गहू पेरणीवर जोर आहे.

अनेक वर्षांच्या खंडानंतर यंदा गव्हाच्या पेरणीक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्याने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. सर्वसाधारण ३० हजार ४७६ हेक्टर क्षेत्र असताना ३२ हजार २०८ हेक्टरवर (१०५.६८ टक्के) पेरणी झाली आहे. जिल्ह्यात मंगळवार (ता. ३१) पर्यंत २ लाख ४७ हजार ५९६ हेक्टरवर (८९.३१ टक्के) रब्बी पेरणी झाली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात जिंतूर, सेलू, मानवत, पूर्णा या चार तालुक्यांतील पेरणीक्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडला आहे. उर्वरित पाच तालुक्यांतील पेरणी क्षेत्र अद्याप सरासरीपेक्षा कमी आहे. ज्वारी १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर, गहू ३० हजार ४७६ हेक्टर, हरभरा ५३ हजार २६४ हेक्टर, जवस १ हजार १९९ हेक्टर, सूर्यफूल १ हजार ९३ हेक्टर आदी पिकांची एकूण २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.

मंगळवार (ता. ३१)पर्यंत ज्वारीची १ लाख २७ हजार ३६३ हेक्टरवर, गव्हाची ३२ हजार २०८ हेक्टरवर, हरभऱ्याची ८० हजार १५८, करडईची ५ हजार ६२७, जवसाची १२, मक्याची ६८३, तर सूर्यफुलाची ३९ अशी एकूण २ लाख ४७ हजार ५९६ हेक्टर म्हणजेच ७९.६६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. जिंतूर, सेलू, मानवत, पूर्णा तालुक्यांमध्ये जास्त क्षेत्रावर पेरणी झाली. परभणी, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांत ५०.५२ ते ९३.४१ टक्के पेरणी झाली. पेरणी सुरू असल्याने क्षेत्र अंतिम केलेले नाही, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक सर्वसाधारण पेरणी क्षेत्र टक्केवारी
ज्वारी १५९०७८ १२७३६३ ८०.०६
गहू ३०४७६ ३२२०८ १०५.६८
हरभरा ५३०६४ ८०१५८ १५१.०६ 
करडई २५२०९ ५६२७ २२.३२
जवस  ११९९ १२ १.००
सूर्यफूल  ४७९८ ३९  ३.५७
मका ९०६ १०१४  १११.९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com