agriculture news in marathi, farmers parliament continues on second day | Page 2 ||| Agrowon

टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी संसदे’त उत्साह कायम

वृत्तसेवा
शनिवार, 24 जुलै 2021

नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह शेतकऱ्यांनी हजेरी लावली.

नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह शेतकऱ्यांनी हजेरी लावली. या वेळी कृषी कायद्यांसह आंदोलक शेतकऱ्यांवर करण्यात येणाऱ्या खोट्या आरोपांचा समाचार घेण्यात आला. तसेच केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी या वेळी करण्यात आली. 

संसद मार्गावरील जंतरमंतर येथे शेतकरी संसद गुरुवार (ता. २२)पासून सुरू आहे. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलनकर्त्या संयुक्त किसान मोर्चाने संसदेचे लक्ष वेधण्यासाठी या प्रतिसंसदेचे आयोजन केले आहे. दुसऱ्या दिवशी हरदेवसिंग हरसी, जगतारसिंग बाजवा, व्ही. व्यंकटरमैया, जंगवीरसिंग चौहान, मुकेश चंद्र, हरपालसिंग बिलारी यांच्या २०० जणांनी यात सहभाग नोंदविला. या वेळी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी ‘आंदोलक शेतकरी नसून मवाली’ अशा केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार शेतकऱ्यांनी घेतला. या वक्तव्यावर आक्षेप नोंदवीत शेतकऱ्यांचा हा अपमान असल्याचे या संसदेने म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांवर खोटे आरोप करणारे भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी माफी मागावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. मोर्चाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली. 

शेतकरी संसदेचे कामकाज अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण वातावरणात झाले. या वेळी प्रश्‍नोत्तराचा तास घेण्यात आला. तसेच  बाजार समिती कायदा याविषयावर चर्चा करण्यात आली. संयुक्त किसान मोर्चाबरोबर यापूर्वीच्या चर्चेदरम्यान केंद्र सरकारच्या संभाव्य ‘वीज सुधारणा विधेयक २०२१’वरून दिलेल्या आश्‍वासन पाळण्याचे तसेच बदल न करण्याचा इशारा देण्यात आला. 

...या ठरावास मान्यता
बाजार समित्या वगळणारा कायद्या (बाजार समिती बायपास कायदा) वरील दोन दिवसांच्या चर्चेनंतर यासंदर्भातील ठरावास एकमताने मान्यता देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याची अंमलबजावणी स्थगित करण्यापूर्वी जून २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यानच्या कारभाराचा प्रतिकूल अनुभव हा ठराव विचारात घेतो. यात कोट्यवधी रुपयांच्या शेतकऱ्यांची पिळवणूक आणि फसवणुकीचा समावेश आहे. ठरावात ‘शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बाजार समित्यांची आवश्‍यकता असून कमी संख्या नको’ असे म्हटले आहे. या ठरावात केंद्रीय कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य सरकारांनी पावले उचलावी, असा आग्रह ठरावात करण्यात आला.


इतर अॅग्रो विशेष
सूक्ष्म सिंचन अनुदानात वाढपुणे ः केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन...
मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
भाजपच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने...मुंबई ः या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे...
‘कथनी आणि करणी’त फरक पुन्हा उघडपुणे : आधीच अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या...
बाजाराचा अंदाज घेऊनच सोयाबीन विक्री करापुणे : सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
लातुरात सोयाबीनच्या भावात तीनशेची घसरणलातूर ः खाद्यतेल आयात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर...
आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक...मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
मॉन्सूनचा महाराष्ट्रातून निरोपपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...
रब्बीसाठी बियाणे पुरवठादार म्हणून...अकोला ः येत्या रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न...
खाद्यतेल आयातशुल्कात मोठी कपातपुणे : काही केल्या खाद्यतेलाचे दर कमी होत नाही...
अतिवृष्टिग्रस्तांसाठी १० हजार कोटीमुंबई ः राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे...
‘सीसीआय’ करणार खुल्या बाजारातून कापूस...नागपूर ः आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणामी...
प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ...लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी...
पंढरपुरात पूरस्थितीसोलापूर ः नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेल्या...
कृषी प्रवेशप्रक्रिया ‘सीईटी’कडेच पुणे ः कृषी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी...
साडेतीन हजार कोटींसाठी साखर...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकविलेली...
‘अंतिम अरदास’मध्ये पुन्हा पाणावले डोळे...लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश : येथील तिकोनिया येथे...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सून माघारीपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...