agriculture news in marathi Farmers pay crop insurance of Rs 23 crore in Latur` | Agrowon

`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा पीकविमा`

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१ योजनेअंतर्गत लातूर जिल्हा बँकेच्या १११ शाखेत तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांनी २३ कोटी ४२ लाख रुपयांचा विम्याचा हप्ता भरणा केला आहे.

लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१ योजनेअंतर्गत लातूर जिल्हा बँकेच्या १११ शाखेत तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांनी २३ कोटी ४२ लाख रुपयांचा विम्याचा हप्ता भरणा केला आहे. पीक विमा भरून घेण्यात ही बँक राज्यात अव्वलस्थानी आहे’’, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष ॲड. श्रीपती काकडे यांनी दिली.

अॅड. काकडे म्हणाले, ‘‘नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना पीक विम्याचा आधार मिळत आहे. जिल्हा बँकेच्या वतीने जिल्हाभरात शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, या साठी स्थानिक पातळीवरील सोसायटी कार्यालयात पीकविमा भरून घेतला गेला. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हा बँकेतर्फे कोविड १९ काळात सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांच्या गावातून पीकविमा भरून घेऊन राज्यात लातूर जिल्हा बँकेने नवा पॅटर्न निर्माण केला. जिल्ह्यात पीक विमा भरण्यासाठी कुठलीही तक्रार न करता सुट्टीच्या दिवशीही बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी पीकविमा स्वीकारला.’’ 

‘‘शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर जिल्हा बँकेने एक वेगळेपण जपले आहे. यासाठी बँकेने मुख्यालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी ग्रामीण भागात नियुक्त केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरून घेण्यासाठी कुठलाही त्रास झाला नाही, अशी माहिती ॲड काकडे यांनी दिली.

उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाट,  बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, सर्व संचालक मंडळाच्या यांच्या सूचनेनुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.


इतर बातम्या
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...
ग्रामबीजोत्पादनासाठी करा ‘महाडीबीटी'’वर...परभणी  ः ‘‘यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यास...