कापूस बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची धाव गुजरात, मध्य प्रदेशात

कापूस बियाणे
कापूस बियाणे

जळगाव ः कापूस लागवडीसंबंधी राज्यात आघाडीवर असलेल्या खानदेशात पूर्वहंगामी लागवडीची तयारी शेतकरी करीत असून, राज्यात कुठेही बियाणे उपलब्ध होत नसल्याने बियाण्यासाठी शेतकरी मध्य प्रदेश व गुजरातेत जात आहेत. तेथून सरळ वाण व बीटी वाणांची खरेदी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.   पूर्वहंगामी लागवड २५ मेपूर्वी व्हायला हवी, असे शेतकरी मानतात. परंतु गुलाबी बोंड अळीला अटकाव व इतर प्रतिबंधात्मक बाबींसाठी राज्यात कापूस बियाणे जूनमध्ये विक्रेत्यांकडे उपलब्ध होतील, असे कृषी विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. जूनमध्ये कुठल्या तारखेला हे बियाणे मिळेल, ती तारीख मात्र सांगितलेली नाही. स्थानिक अधिकारी मे अखेरीस बियाणे मिळेल, असे सांगतात. यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. पूर्वहंगामी लागवड २५ मेपूर्वी व्हायला हवी, यासाठी शेतकरी बियाणे खरेदीसंबंधी परराज्यात जात आहेत. त्यात नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नंदुरबार या भागातील शेतकरी गुजरातमधील निझर (जि. तापी), मध्य प्रदेशातील बडवानी भागात जात आहेत. धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर भागातील शेतक री मध्य प्रदेशातील सेंधवा, इंदूर भागात जात आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा, जळगाव भागातील शेतकरी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, सेंधवा भागात बियाण्यासाठी धाव घेत आहेत.  रावेर, मुक्ताईनगरमधील शेतकरी दर बऱ्हाणपुरातून दोन तासात हे बियाणे आणू शकतील एवढे कमी अंतर आहे. याशिवाय रेल्वे, एसटी बसची गतिमान सेवा असल्याने अनेक शेतकरी मध्य प्रदेश व गुजरातेत जात आहेत. तेथे सरळ वाण प्रतिपाकीट १००० रुपये आणि बीटी वाणही प्रतिपाकीट ९०० ते १००० रुपयांना मिळत आहेत. पूर्वहंगामी लागवड तापी व गिरणाकाठी अधिक होईल. खानदेशात मिळून सुमारे एक ते सव्वा लाख हेक्‍टरवर पूर्वहंगामी लागवड अपेक्षित आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे ७० ते ८० हजार हेक्‍टर पूर्वहंगामी लागवड अपेक्षित आहे. कापूस लागवडीसंबंधी यावल, रावेर, जळगाव, चोपडामधील तापीकाठी अनेक शेतकऱ्यांनी पूर्वमशागत, ठिबकची व्यवस्था करून ठेवल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com