सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गहू पेरणीस पसंती

यंदा रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला उशिरा सुरुवात झाली. गेल्या वर्षाइतकेच यंदाही रब्बीचे क्षेत्र राहील. हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली असून, पेरणी क्षेत्रात पाच टक्के वाढ होईल, अशी आशा आहे. - सुरेश मगदूम,कृषी उपसंचालक, सांगली.
Farmers prefer to sow wheat in Sangli district
Farmers prefer to sow wheat in Sangli district

सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात ८२ टक्के पेरा झाला आहे. सरासरी क्षेत्र २ लाख ५१ हजार ४९८ हेक्‍टर आहे. जिल्ह्यात गव्हाची पेरणी सर्वाधिक झाली आहे. एकूण २ लाख ६ हजार ३५३ हेक्‍टरवर गहू, ज्वारी, हरभरा, मका या पिकांची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 

जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची काढली लांबणीवर पडली होती. त्यात शेतात पाणी साठल्याने रब्बीतील पेरणीला उशिरा प्रारंभ झाला. गेल्या डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरणीला गती आली. जत तालुक्‍यात ६१०२ हेक्‍टरवर गव्हाचा पेरा झाला आहे. पाण्याची उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांचा गहू पीक घेण्याकडे कल वाढला आहे. 

हरभरा पिकाची ८७ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील जत तालुक्‍यात करडई पीक घेतले जाते. जतसह इतर तालुक्‍यातही सूर्यफुलाची पेरणी केली जाते. मात्र, यंदा जत तालुका वगळता दुसऱ्या कोणत्याही तालुक्‍यात सूर्यफुलाची पेरणी झालेली नाही. या तालुक्‍यात ४८८ हेक्‍टरवर सूर्यफुलाची पेरा झाला आहे. 

करडईच्या क्षेत्रात घट 

जत तालुक्‍यात करडईचे प्रामुख्याने पीक घेतले जाते. पारंपरिक पद्धतीने पिकाची पेरणी केली जाते. मात्र, करडईला अपेक्षित दर मिळत नसल्याने या पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. तालुक्‍यात करडईचे सरासरी क्षेत्र २१२८ हेक्‍टर असून, केवळ ३२१ हेक्‍टरवर म्हणजे १५ टक्के पेरणी झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com