नागपुरात शेतकऱ्यांचा थेट बांधावर गौरव

नागपुरात शेतकऱ्यांचा थेट बांधावर गौरव
नागपुरात शेतकऱ्यांचा थेट बांधावर गौरव

नागपूर : वसंतराव नाईक मानवी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे कृषी दिनाच्या औचित्य साधून शेतकऱ्यांचा थेट बांधावरच सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे दत्तक गाव फेटरी येथे हा उपक्रम झाला.  

या संस्थेच्या वतीने दरवर्षी बांधावर शेतकऱ्यांचा गौरव केला जातो. आगळ्यावेगळ्या पद्धतीने कृषी दिन साजरा करण्यावर संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून भर दिला आहे. यावर्षी विदर्भातील सर्वच जिल्हयात हा उपक्रम राबविण्यात आला.

नागपूर जिल्हयात मुख्यमंत्र्यांचे दत्तक गाव असलेल्या फेटरी येथे शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. कृषिदूत एकनाथ पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातंर्गंत फळझाड लागवडही केली गेली. 

या वेळी जिल्हा परिषद सदस्य सुनील जामगडे, पंचायत समिती सदस्य प्रभाकर उईके, वनराईचे सदस्य धनश्री ढोमणे, चिचोली ग्रामपंचायत सरपंच मीना कोडापे, प्रकल्प समन्वयक डॉ. प्रशांत राऊत, कमलेश मनोहर, दामोदर लंगडे, मुकेश ढोमणे, प्रभाकर बानाईत, विनया गायकवाड, प्रेम ढोणे, प्रशांत पवार, अनिल बनसोड, रामचंद्र चुकांबे, राजेश पुसदेकर, आशिष चांदूरकर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com