धुळ्यात कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांचे ठिबकला प्राधान्य

कापडणे, जि.धुळे ः गादी वाफ्यावर कांदा लागवड करताना मजूर. (छायाचित्र ः जगन्नाथ पाटील)
कापडणे, जि.धुळे ः गादी वाफ्यावर कांदा लागवड करताना मजूर. (छायाचित्र ः जगन्नाथ पाटील)

कापडणे, ता. धुळे : जिल्ह्यातील धुळे व शिंदखेडा तालुक्‍यांत सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळी स्थिती आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकांची पाणीपातळी खोलवर गेली असून, यंदा पाण्याचे संकट लक्षात घेता उन्हाळी कांदा लागवड करताना ठिबकचा अधिक वापर शेतकरी करीत आहेत.

कांद्यासाठी अधिक पाण्याची गरज असते. यंदा पाणी हवे तेवढे नाही, त्यामुळे ठिबकचा वापर करून गादी वाफ्यावर कांदा लागवडीकडे कल आहे. कमी पाण्यात उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. सध्या उन्हाळी कांद्याची लागवड जोमात सुरू आहे.

ठिबक, गादी वाफ्यावर कांदा लावणीचा खर्च अधिक आहे. एकरभर शेतीत कांदा लागवडीसाठी वीस ते पंचवीस महिला मजूर लागतात. परंतु पाण्याचा वापर मर्यादित राहावा म्हणून शेतकरी अधिक खर्च करायलाही तयार आहेत. कापडणे (जि. धुळे) येथील निवृत्त मुख्याध्यापक संभाजी पाटील, राजा पाटील, महेंद्र यशवंत पाटील, नवल नामदेव पाटील, शालिग्राम पाटील, बन्सिलाल माळी, निवृत्त प्राचार्य विश्वासराव देसले, शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील, शांतूभाई पटेल, गोकूळ पाटील, तुषार लहू पाटील, शांताराम माळी आदी शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करून गादी वाफ्यावर यंदा कांदा लागवड केली आहे.

हा बदल इतर शेतकरीही टिपत असून, न्याहळोद व इतर भागांतही ही पद्धत वाढू लागली आहे. नॉन आयएसआय ठिबक अनेकजण वापरत असल्याचे चित्र असून, कमी खर्चात हा ठिबक संच मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com