agriculture news in Marathi, farmers producers companies ready for procurement on MSP, Maharashtra | Agrowon

शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची तयारी पूर्ण : महाएफपीसी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी उत्पादक कंपन्यांना संस्थात्मक संरचनेमध्ये सामावून घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, यामुळे उत्पादन क्षेत्रात गाव पातळीवर क्लस्टर स्तरावर कंपन्यांच्या प्रक्षेत्रावर खरेदी केंद्रे सुरू झाले आहेत. याचा फायदा प्रामुख्याने लहान व छोट्या शेतकऱ्यांना होणार आहे, अशी माहिती महाएफपीसीच्या सूत्रांनी दिली.

पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी उत्पादक कंपन्यांना संस्थात्मक संरचनेमध्ये सामावून घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, यामुळे उत्पादन क्षेत्रात गाव पातळीवर क्लस्टर स्तरावर कंपन्यांच्या प्रक्षेत्रावर खरेदी केंद्रे सुरू झाले आहेत. याचा फायदा प्रामुख्याने लहान व छोट्या शेतकऱ्यांना होणार आहे, अशी माहिती महाएफपीसीच्या सूत्रांनी दिली.

केंद्र व राज्य सरकार शेतकरी उत्पादक कंपन्यांना बळ देत असल्याच्या पार्श्वभूमीवर हमीभाव योजना अंमलबजावणीत कंपन्यांच्या सहभागामुळे आमूलाग्र बदल होत असून, थेट शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याबरोबरच बाजार स्थिर राहण्यास मदत होणार आहे. हमीभाव खरेदीत सुसूत्रता येण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना विक्री केलेल्या मालाचे चुकारे वेळेत मिळण्यासाठी राज्य शासन स्तरावर विशेष निर्णय घेण्यात आले असून, प्रधान सचिव (पणन) श्री. अनुपकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हमीभाव योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन सुरू आहे. राज्यस्तरीय हमीभाव खरेदी नोंदणीचा शुभारंभ रविवारी (ता. १५) गोदा फार्मर प्रोड्यूसर कंपनी (हिंगोली) येथे शेतकरी मेळाव्याने होत आहे.

बाजारात खरीप हंगामात कापणी झालेल्या मूग व उडदाची आवक सुरू झाली असून, शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा बाजारभाव कमी मिळू नयेत यासाठी हमीभाव खरेदी केंद्रांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सभासद शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आवश्यक असणारी तयारी केली असल्याची माहिती महाएफपीसीच्या सूत्रांनी दिली.

राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये नियोजन बैठका घेऊन पीक परिस्थिती, उत्पादकता यांचा आढावा घेऊन खरेदी केंद्र सुरू करण्यास सक्षम असणाऱ्या संस्थांचीदेखील पडताळणी करण्यात आली आहे. पात्रता निकषांमध्ये धान्य, स्वच्छता प्रतवारी सुविधा, व्यवस्थापन, कुशल मनुष्यबळ, सभासद संख्या, गोदामांची व्यवस्था यांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रामधील ९४ शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून १७ जिल्ह्यांमधील ७२ तालुक्यांमध्ये केंद्रे सुरू होणार आहेत. 

हमीभाव खरेदीच्या खरीप व रब्बी हंगामात १ लाख शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट्य महाएफपीसी मार्फत ठेवण्यात आले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या या सभासद शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्था असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी कंपनीचे सभासद होऊन हमीभाव खरेदीत सहभाग नोंदविण्यासाठी शिवार स्तरावर शेतकरी मेळावे, घोंगडी बैठका आयोजित करून पीकनिहाय हमीभाव, शेतमालाचा एफएक्यू दर्जा याबाबत जनजागृती सुरू केली असून, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

इतर बातम्या
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊससातारा : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१८) सर्वदूर...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...