Agriculture news in marathi; Farmers to protest against crop leakage at Yavatmal | Agrowon

यवतमाळ येथे पीककर्जाविरोधात शेतकरी करणार नागडा पोळा साजरा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

यवतमाळ  ः कर्जाचे पुनर्गठण करून नव्याने कर्ज देण्याचे आश्‍वासन निव्वळ पोकळ ठरले आहे. जिल्ह्यात आजही हजारावर शेतकरी पीककर्जापासून वंचित असल्याचा आरोप करीत याविरोधात नागडा पोळा साजरा करण्याचा इशारा शेतकरी वारकरी संघटनेने दिला आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भाने निवेदन देण्यात आले.

यवतमाळ  ः कर्जाचे पुनर्गठण करून नव्याने कर्ज देण्याचे आश्‍वासन निव्वळ पोकळ ठरले आहे. जिल्ह्यात आजही हजारावर शेतकरी पीककर्जापासून वंचित असल्याचा आरोप करीत याविरोधात नागडा पोळा साजरा करण्याचा इशारा शेतकरी वारकरी संघटनेने दिला आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भाने निवेदन देण्यात आले.

 सिंचनाच्या सोयीसुविधांअभावी यवतमाळ जिल्ह्यात कोरडवाहू पिके घेतली जातात. निसर्गावर अवलंबून असलेल्या या शेती पद्धतीमध्ये शाश्‍वती काहीच नाही. परिणामी एखाद वर्षी ओल्या तर एखाद्या वर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. यातूनच दरवर्षी उत्पादकता प्रभावित होत असल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यामुळे आलेल्या नैराश्‍यातून जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. असे असतानाही बॅंकांकडून आजपर्यंत हजारांवर शेतकऱ्यांना साध्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले नाही. कर्जाचे पुनर्गठण करून शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज देण्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु त्यांच्या अंमलबजावणीकडे मात्र प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले. त्याच्या परिणामी शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. बॅंकांकडून कर्ज मिळत नसल्याने अनेकांनी खासगी कर्ज घेत पेरणी केली. त्यानंतर निंदण, खते व फवारणीसाठीच्या  खर्चासाठी देखील शेतकऱ्यांवर वणवण भटकंतीची वेळ आली आहे.

पीककर्जाविषयी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. पोळ्यासारखा सण साजरा करण्यासाठी देखील शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयातच नागडा पोळा साजरा करण्याचा इशारा शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी दिला आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना या संदर्भाने निवेदन देण्यात आले. या वेळी अनुप चव्हाण, दीपक मडसे, अविनाश रोकडे, कैलास फुफरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
संशोधन केंद्राने दिले अवजारे दुरुस्तीचे...चंद्रपूर ः शेतकऱ्यांकडील बरीच कृषी अवजारे देखभाल...
डोंगरपायथ्याच्या भातपिकांवर रोगांचा...सिंधुदुर्ग ः ऊन-पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे...
मंचर बाजारात मागणीअभावी बटाटा वाणाची...मंचर, जि. पुणे  : येथील बटाटा बाजारपेठेवर...
नगर जिल्ह्यात खरिपात पीक कापणीचे...नगर  ः खरिपातील पिकांची उत्पादकता निश्चित...
नगरचे पाणी बीड नेणार ही फक्त अफवा ः...नगर  : मुळा धरणातून बीडला पाणी नेणार, हा...
शेतीमाल विक्रीसाठी तीन जिल्ह्यांतील...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत...
`येलदरी`त ११.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठापरभणी : परभणी-हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरून...
बुलडाणा जिल्ह्यात वादळ, गारपिटीमुळे ८०...बुलडाणा  : गेल्या आठवड्यात बुलाडाणा...
मकाप्रक्रिया प्रकल्प, कॉटनहबसाठी...सिल्लोड, जि. औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर...
मोदींनी देशाला बरबाद केलेः राहुल गांधीऔसा, जि. लातूर: मोदी सरकारने काही मोजक्या...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक आणि मागणी...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दडपशाही थांबविण्यासाठी सत्ता परिवर्तन...नगर ः ‘‘महाराष्ट्र राज्यासाठी ही निवडणूक...
गहू पिकावरील मावा किडीचा घेतला जातोय...आंतरराष्ट्रीय कृषी आणि जैवशास्त्र केंद्र येथील...
नगर जिल्ह्यात ज्वारीची पावणे तीन लाख...नगर : जिल्ह्यामधील बहुतांश भागात गेल्या आठ...
साताऱ्यात जोरदार पावसाने स्ट्रॉबेरीचे...सातारा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी परतीच्या...
हवामान बदल रोखण्यासाठी पावले उचलण्याची...हवामान बदलावरील आंतरसरकारी पॅनेल (...
कर्जत- जामखेडमध्ये सर्वांची प्रतिष्ठा...नगर : दोन वेळा मतविभागणीमुळे पालकमंत्री राम शिंदे...
मराठवाड्यात ११० मंडळांत पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी ११०...
परभणी येथील दुग्धशाळेतील दूध संकलनात घटपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
मराठवाड्यातील ५३१ गावांत, वाड्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील ५३१ गावे-वाड्यांची तहान...