agriculture news in marathi Farmers protest How can highways be blocked perpetually asks Supreme Court | Page 3 ||| Agrowon

शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय भडकले... 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021

राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलकांवर शुक्रवारी (ता.1) सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले. 

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलकांवर शुक्रवारी (ता.1) सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले. ‘तुम्ही अवघ्या शहराचा गळा घोटला असून आता शहरामध्ये येऊन तुम्हाला आंदोलन करायचे आहे.’ अशा शब्दांत न्यायालयाने किसान महापंचायतीला सुनावले. 

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या काही शेतकरी संघटनांनी जंतरमंतरवर सत्याग्रह करू द्यावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. केंद्रीय कृषी कायद्यांना न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले असताना हे आंदोलन सुरू ठेवण्यात काय अर्थ आहे? अशी विचारणा करतानाच न्यायालयाने या संघटनेला देशातील सर्वसामान्य नागरिकांना देखील मुक्तपणे, भीतीशिवाय फिरण्याचा पूर्ण अधिकार असून याबाबत संतुलित दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे असल्याचे सांगितले. न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. सी.टी.रवीकुमार यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याचिकाकर्त्या संघटनेलाच तुम्ही यासाठी स्थानिक रहिवाशांची परवानगी घेतली आहे का? याबाबत ते खरोखरच आनंदी आहेत का? असे सवाल केले. 

संतुलित दृष्टिकोन बाळगा 
किसान महापंचायतीने सादर केलेल्या याचिकेमध्ये किमान शंभर आंदोलक शेतकऱ्यांना जंतरमंतरवर शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती. न्यायालयाने या याचिकेची दखल घेतली. आधीच तुम्ही सगळ्या शहराचा गळा घोटला असून आता शहरामध्ये येऊन तुम्हाला आंदोलन करायचे आहे. एकूणच या आंदोलनाबाबत संतुलित दृष्टिकोन बाळगणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालय म्हणाले की, ‘‘ आता तुम्हाला सत्याग्रह करायचा आहे, त्यात काहीही अडचण नाही पण तुम्ही न्यायालयामध्ये आले आहात. येथे आला आहात तर तुम्हाला आमच्यावर विश्‍वास ठेवायला हवा. देशाची न्यायव्यवस्था तुमच्या खटल्याचा योग्य पद्धतीने विचार करेल. याप्रकरणात याचिकाकर्त्यांनी कृषी कायद्यांविरोधात याआधीच उच्च न्यायालयाचे दार ठोठावले असून आता तुम्ही यावर जलदगतीने सुनावणी घेतली जावी अशी मागणी करू शकता. हे एवढे सगळे झाले असताना परत सत्याग्रह करण्यात काय अर्थ आहे.’’ 

आंदोलन कोर्टाविरोधात आहे का? 
आजच्या सुनावणीवेळी न्यायालयाने किसान महापंचायतीची बाजू मांडणाऱ्या वकिलांना तुम्ही देशाच्या न्यायव्यवस्थेविरोधात आंदोलन करत आहात का? असा सवाल केला. यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. तुम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे पण सामान्य नागरिकांना देखील रस्त्यांवर मुक्तपणे, कोणत्याही भीतीशिवाय फिरण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले. अनेकांच्या मालमत्तांचे नुकसान झाले आहे. या आंदोलनामुळे तुम्ही खरोखरच आनंदी आहात का? अशी विचारणा तुम्ही स्थानिकांना कधी केली होती का? हा खुशामतीचा धंदा थांबायला हवा, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

न्यायालय म्हणाले 

  • लोकांनाही मुक्तपणे फिरण्याचा पूर्ण अधिकार 
  • आंदोलनादरम्यान सुरक्षा रक्षकांना मारहाण झाली 
  • लष्करी कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान धक्काबुक्की झाली 
  • महामार्ग रोखले जात असतील तर आंदोलन शांततापूर्ण कसे? 
  • रस्ते रोखण्यात आल्याने सार्वजनिक वाहतुकीला फटका 

त्याचा उल्लेख करा 
न्यायालयाने सुनावल्यानंतर आंदोलकांच्या संघटनेने आमच्या लोकांनी रस्ते रोखले नसल्याचे नमूद केले त्यावर न्यायालयाने आम्ही याची दखल घेऊ असे सांगितले. याबाबत याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी शपथपत्र सादर करू असेही सुनावणीदरम्यान सांगितले. आता याप्रकरणाची सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होईल. या सुनावणीवेळी सादर करण्यात येणाऱ्या शपथपत्रामध्ये आमच्या संघटनेने रस्ते रोखलेले नाही याचाही उल्लेख करा, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले. याची एक प्रत ॲटर्नी जनरल आणि केंद्रीय तपाससंस्थेला देण्यास सांगण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
सांगलीत दोन महिन्यांत डीएपीचा रॅक आलाच...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ५२...
जिल्हा बॅंक निवडणुकीतून खासदार...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक...
सांगली मार्केट यार्डात हळद-गूळ...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
तमिळनाडूला पावसाने झोडपले..चेन्नई : तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सरकारकडून...मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये...
‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात...नागपूर : केंद्र सरकारनेच नव्या मार्गदर्शक...
तेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री...हैदराबाद : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात...
२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या...नवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा...
सांगलीच्या परवान्यावर कर्नाटकात परस्पर...सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील संतगोळ...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच, शेतकऱ्यांच्या...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात गेल्या सहा-सात...
लखीमपूर खेरी हिंसाचार : माजी...नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
वातावरण बदलाविरुद्ध क्रांतीच्या तीन दिशाभारताच्या उत्तर भागामधील सर्वांत जास्त...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊससिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा तीस टक्के...रत्नागिरी ः दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे...
नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे...नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने...
गडचिरोलीत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा...गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला...