Agriculture news in marathi Farmers queue for onion auction registration in yewala Market | Agrowon

येवल्यात कांदा लिलाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

येवला, जि. नाशिक ः कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवार (ता. १८) पासून कांदा लिलाव सुरू होणार आहे. मात्र, त्यासाठी आदल्या दिवशी बाजार समितीत शेतकऱ्यांना नाव नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. या नियमामुळे नावनोंदणीसाठी आज (शुक्रवारी) बाजार समितीत शेतकऱ्यांची लांबच लांब रांग लागली होती.

येवला, जि. नाशिक ः कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवार (ता. १८) पासून कांदा लिलाव सुरू होणार आहे. मात्र, त्यासाठी आदल्या दिवशी बाजार समितीत शेतकऱ्यांना नाव नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. या नियमामुळे नावनोंदणीसाठी आज (शुक्रवारी) बाजार समितीत शेतकऱ्यांची लांबच लांब रांग लागली होती.

शनिवारी आपला कांदा विक्री व्हावा, यासाठी शेतकरी नाव नोंदणी करण्यासाठी मोठ्या संख्येने जमा झाले होते. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांदा काढून ठेवला असून लॉकडाऊनचा फटका बसून अनेक बाजार समित्या गेल्या दोन आठवड्यांपासून धरसोड पद्धतीने चालू बंद राहत आहे.

त्यातच मागील व चालू आठवड्यात तर सर्वत्र लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांना कांदा खराब होण्याची भीती लागली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने शेतकरी अजूनच धास्तावले असून कांदा खराब होण्याची व भाव पडण्याची देखील भीती आहे. 

त्यामुळे लिलाव सुरू होण्याचे कळताच शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बाजार समितीत गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू  शकतो, त्यामुळे काळजी घेत बाजार समितीने शनिवारपासून लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेत शुक्रवारी नाव नोंदणी करून टोकन घ्यावे, अशा सूचना दोन दिवसांपूर्वी दिल्या होत्या.

त्यामुळे आज सकाळपासूनच बाजार समितीत नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांची लांबच लांब रांग लागली. एकेक करत शेतकऱ्यांची नाव नोंदणी दुपारपर्यंत सुरू होती. प्रत्येक लिलावाच्या दिवशी येवल्यात फक्त पाचशे व अंदरसुलला ३०० ट्रॅक्टरची नोंदणी करून लिलाव केले जाणार असल्याची माहिती सभापती उषाताई शिंदे, सचिव कैलास व्यापारे यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...