Agriculture news in marathi Farmers raid bank officials at Mohol | Agrowon

मोहोळ येथे शेतकऱ्यांनी बॅंक अधिकाऱ्यांना कोंडले

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

मोहोळ, जि. सोलापूर : अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्‍यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदान जाहीर झाले. त्याचे २१ कोटी ३७ लाख ६० हजार रुपये जमा होऊन एक महिन्याहून अधिक काळ उलटून गेला. तरीही अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे न जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. त्यामुळे जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. २२) बॅंक अधिकाऱ्यांना कोंडले. 

मोहोळ, जि. सोलापूर : अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्‍यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदान जाहीर झाले. त्याचे २१ कोटी ३७ लाख ६० हजार रुपये जमा होऊन एक महिन्याहून अधिक काळ उलटून गेला. तरीही अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे न जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. त्यामुळे जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. २२) बॅंक अधिकाऱ्यांना कोंडले. 

गेल्या आठवड्यापासून याबाबत जनहित शेतकरी संघटना पाठपुरावा करत आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून (ता. २१) तहसील कार्यालयासमोर यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांनी आमच्याकडून पैसे बॅंकेत जमा झाले आहेत. जवळपास २१ कोटी ३७ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून आले आहेत. ते बॅंकेत जमा केल्याचे लेखी पत्रच तहसीलदारांनी दिले. त्या रकमा आयसीआयसीआय बॅंकेच्या मोहोळ शाखेत जमा केल्याचे लक्षात आले. 

आंदोलकांनी बॅंकेत जाऊन अधिकाऱ्यांकडे चौकशी केली.  सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आंदोलकांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना कोंडून ठिय्या आंदोलन सुरू केले. २१ कोटी ३७ लाख ६० हजारांपैकी बॅंकेकडे सुमारे १९ कोटी एवढी रकम जमा झाल्याचे बॅंकेचे अधिकारी नागेश नागोर यांनी सांगितले. 

याद्या येतील, तसा निधी जमा होणार

शासनाकडून प्राप्त १२ हजार ५८५ शेतकऱ्यांच्या खात्यांवर सुमारे ११ कोटी रुपये जमा केले आहेत. उर्वरित रक्कम शिल्लक आहे. तहसील कार्यालयाकडून जशा याद्या प्राप्त होतील, त्याप्रमाणे त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार आहे, असे बॅंकेचे अधिकारी नागेश नागोरे यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


इतर बातम्या
पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा...मुंबई : महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा...
बुलडाण्यात जिल्हाधिकारी चंद्रा यांनी...बुलडाणा  ः कृषी विभागामार्फत जिल्ह्यात...
‘पीएम-किसान’चा १२ कोटी शेतकऱ्यांना...नवी दिल्ली: शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी...
नैसर्गिक रंग बनविण्याचे महिलांनी...अकोला  ः पुढील महिन्यात रंगपंचमीचा उत्सव जवळ...
आंबा, काजू क्लस्टरसाठी रत्नागिरी,...रत्नागिरी : विविध देशांमधील आंबा, काजूची निर्यात...
बदलत्या हवामानाचा गव्हाला फटकाअमळनेर, जि. जळगाव  : तालुक्‍यात गहू पिकाची...
भंडारा जिल्ह्यात धान विक्रीचे १११...भंडारा  ः शासनाने हमीभावात बोनसच्या...
पंजाबमध्ये भूमिहीन शेतमजुरांना कर्जमाफीचंदीगड, पंजाब: राज्याचा २०२०-२१ चा १.५४ लाख...
देशात ११० लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाजनवी दिल्ली: देशात यंदा हरभरा उत्पादनात वाढ...
‘पोकरा’तील सामुदायिक शेततळे, शेळीपालन...अकोला ः राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी...
लाल कंधारी, देवणी गोवंश संवर्धनासाठी...परभणी  ः मराठवाडा विभागातील लाल कंधारी आणि...
गोंदिया जिल्ह्यात भरडाईच्या...गोंदिया  ः भरडाईसाठी धानाची उचल होण्याची गती...
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
चांदवड येथे साडी नेसून आंदोलननाशिक : चांदवड खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...