Agriculture news in Marathi farmers 'Reduce injustice in electricity tariff cuts' | Agrowon

‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा’

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग, घरगुती वीज तसेच शेती वीज दर कपातीची घोषणा केली. मात्र, त्यामध्ये शेतीसाठी सर्वात कमी एक टक्का वीज दर कपातीची घोषणा करून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. शासनाने या बाबत तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी भारत कृषक समाजातर्फे मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व वीज नियामक आयोगाकडे करण्यात आली आहे. 

अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग, घरगुती वीज तसेच शेती वीज दर कपातीची घोषणा केली. मात्र, त्यामध्ये शेतीसाठी सर्वात कमी एक टक्का वीज दर कपातीची घोषणा करून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. शासनाने या बाबत तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी भारत कृषक समाजातर्फे मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व वीज नियामक आयोगाकडे करण्यात आली आहे. 

याबाबत भारत कृषक समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. प्रकाश मानकर यांनी निवेदन पाठविले. निवेदनात म्हटले की, राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योगामध्ये विजेच्या दरात १० ते १२ टक्के, घरगुती विजेत पाच ते सात टक्के व शेतीसाठीच्या दरात फक्त एक टक्का वीज दर कपातीची घोषणा केली. १ एप्रिल पासून अमलात आणण्याचे जाहीर केले. शेतीला व शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त सावरण्याची गरज असताना त्यांना फक्त एक टक्क्याची सवलत दिली. 

शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे. ही एक टक्का वीज दर कपात कोणत्या निकषाने जाहीर केली याचा खुलासा आयोगाचे अध्यक्ष आनंद कुळकर्णी यांनी करावा. सगळ्यात जास्त रोजगाराच्या संधी शेती व शेतीशी निगडीत व्यवसायातून निर्माण होतात. आता हा व्यवसाय अस्मानी व सुलतानी संकटामुळे कायमचा धोक्यात आल्याने त्याला त्यातून बाहेर काढण्याची गरज आहे. कितीही जागतिक मंदी असली तरीही, त्यातून फक्त शेती व्यवसायच वाचवू शकतो. आत्ताचे राज्याचे आघाडी सरकार शेतकऱ्यांसाठीच सत्तेवर आल्याचे सांगतात. मग त्यांना ही एक टक्का कपात कशी काय मान्य केली आहे असा प्रश्नही डॉ. मानकर यांनी उपस्थित केला आहे. दिवसा किमान १२ तास वीज पुरवठा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...