बियाणे प्रमाणीकरणासाठी पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी केली पिकांची नोंदणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी  ः २०१८-१९ मधील खरीप हंगामात महाराष्ट्र राज्य बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेअंतर्गत परभणी येथील विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी कार्यालयाकडे परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील १३ हजार ७४० शेतकऱ्यांनी ३२ हजार ९२९.२० हेक्टर बीजोत्पादन क्षेत्रावरील पिकांची बियाणे प्रमाणीकरणासाठी नोंदणी केली.

परभणी येथील विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी कार्यालयाकडे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७ हजार १३१ शेतकऱ्यांनी १९ हजार २७४ हेक्टरवरील सोयाबीनची, ८८ शेतकऱ्यांनी १६३ हेक्टरवरील तूरीची, २७ शेतकऱ्यांनी ४२.४० हेक्टरवरील उडिदाची, १०१ शेतकऱ्यांनी १८२ हेक्टरवरील मूगाची तर अन्य पिकांची ८ शेतकऱ्यांनी ७८ हेक्टर अशी एकूण ७३५५ शेतकऱ्यांनी १९,७४०.४० हेक्टवरील पिकांची नोंदणी केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील १ हजार २९६ शेतकऱ्यांनी २८१३.२० हेक्टरवरील सोयाबीनची, ४ शेतकऱ्यांनी ३.२० हेक्टरवरील तुरीची, ५६ शेतकऱ्यांनी ९२ हेक्टरवरील उडिदाची, २ शेतकऱ्यांनी २ हेक्टरवरील मुगाची, ४ शेतकऱ्यांनी ७.६० हेक्टरवरील इतर पीकांची अशी एकूण १ हजार ३६३ शेतकऱ्यांनी २९१८ हेक्टरवरील पिकांची नोंदणी केली आहे.

लातूर जिल्ह्यातील ३ हजार ८३ शेतकऱ्यांनी ६ हजार ४८२ हेक्टरवरील सोयाबीनची, ११५ शेतक-यांनी १६५.२० हेक्टरवरील तुरीची, १ शेतकऱ्यांनी ०.४० हेक्टरवरील भाताची, ३३ शेतकऱ्यांनी ५१.६० हेक्टरवरील उडदाची, १ शेतकऱ्याने ०.८० हेक्टरवरील मुगाची, २२ शेतक-यांनी २७.६६ हेक्टरवरील इतर पिकांची अशी एकूण ३२५५ शेतकऱ्यांनी ६७२८ हेक्टवरील पिकांची नोंदणी केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील १६५५ शेतकऱ्यांनी ३३५९.२० हेक्टरवरील सोयाबीनची, ७२ शेतकऱ्यांनी १२१.६० हेक्टरवरील तुरीची, २२ शेतकऱ्यांनी ३५.२० हेक्टरवरील उडदाची, ९ शेतकऱ्यांनी ७.६० हेक्टरवरील मुगाची, ९ शेतकऱ्यांनी १८.८० हेक्टरवरील इतर पिकांची अशी एकूण १७६७ शेतकऱ्यांनी ३५४२ हेक्टरवरील पिकांची बीजप्रमाणीकरणासाठी नोंदणी केली आहे, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com