तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना घातली भरडधान्य शेतीने भुरळ

रडधान्य उत्पादन, प्रक्रियेसाठी कर्नाटक व आंध्र प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात अधिक वाव आहे. याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी बारामतीमधील कृषी तंत्रज्ञान सप्ताह महत्त्वपूर्ण ठरत आहे.
techoligical week
techoligical week

माळेगाव, जि. पुणे ः भरडधान्य उत्पादन, प्रक्रियेसाठी कर्नाटक व आंध्र प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात अधिक वाव आहे. याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी बारामतीमधील कृषी तंत्रज्ञान सप्ताह महत्त्वपूर्ण ठरत आहे. विशेषतः राळे, वरई, वरी, भगर, कोद्रा आणि ब्राऊन टॉप मिलेट या भरडधान्य पिकांची माहिती घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी येथील भरडधान्य शिवारामध्ये गर्दी केली होती.  अॅग्रिकल्चर डेव्हलमेंट ट्रस्ट- बारामती कृषी विज्ञान केंद्रात कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.१९) अनेक शेतकऱ्यांनी भरडधान्य पीक शिवाराला भेट दिली.  कृषी विज्ञान केंद्राचे संतोष करंजे म्हणाले, की गहू आणि तांदूळ ही पिके मुळात आपली नव्हती. गहू अमेरिका, तांदूळ फिलिपिन देशातून आला. या धान्यांमध्ये ग्लुटेनचे प्रमाण जास्त आहे. अर्थात, हे घटक आपल्या शरीराला हानिकारक आहेत. यामध्ये कार्बेाहायड्रेट आणि फायबर योग्य प्रमाणात नाहीत. दुसऱ्या गटात ज्वारी, बाजरी, नाचणी ही भरडधान्ये आहेत, परंतु यांच्या खाण्याने आपल्या शरीराला जास्त फायदाही नाही आणि तोटाही नाही. त्यामुळे याला आपण निष्क्रिय भरडधान्य म्हणतो. पहिल्या गटात जी भरडधान्ये आहेत, ती म्हणजे राळे, वरई, भगर, कोद्रा, ब्राऊन टॉप मिलेट ही पाच भरडधान्ये पौष्टिक आहेत. त्यामध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण योग्य असल्याने शरीराला अधिक फायदे आहेत. सहाजिकच आपण रोगमुक्त राहण्यासाठी या पिकांचा उपयोग आपल्या आहारात अधिक असणे आवश्यक आहे. विशेषतः या पिकांसाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश सरकारने हमीभाव जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात हे धोरण राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

शेतकऱ्यांना उत्सुकता ‘‘राळे, वरई, वरी, भगर, कोद्रा आणि ब्राऊन टॉप मिलेट ही भरडधान्य पिके आम्ही पहिल्यांदा पाहत आहोत. सर... हे कुठल्या जमिनीत येते आणि कुठल्या हंगामात येते, पाणी किती लागते, त्याचे पदार्थ काय बनविले जातात, याला मार्केट रेट काय आहे,’’ असे अनेक प्रश्‍न घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे कृषी तंत्रज्ञान सप्ताहात शिवारातच निराकरण केले जात आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com