अाॅनलाइन नोंदणी न झाल्यास शेतकरीच जबाबदार !

अामच्याकडे दोन संगणक अाहेत. त्यावर इंटरनेट व्यवस्थित चालत नव्हते. दोन दिवसात केवळ ३०० अर्ज अाॅनलाइन झाले. त्यामुळे बाहेर ३०० अर्ज दिले. तरीही ६०० अर्ज शिल्लक होते. जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांनी २३ तारीख नोंदणीची शेवची असल्याचे सांगत अाॅफलाइन अर्ज घेऊ नका असे सांगितले. शेतकरी जास्त अाल्याने यावर काही तोडगा म्हणून अध्यक्षांसोबत बोलून अाम्ही पर्याय तयार केला. शेतकऱ्यांचे अर्ज अाॅनलाइन नोंदणीसाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करीत अाहोत. - अरुण इंगोले, व्यवस्थापक, खविसं, मालेगाव जि. वाशीम
तूर नोंदणी
तूर नोंदणी

अकोला ः शासनाच्या आधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना अाॅनलाइन नाव नोंदणीचे निर्देश देण्यात अाले आहेत. ही नावनोंदणी करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील खरेदी-विक्री संघाच्या केंद्रावर एक वेगळाच अर्ज लिहून द्यावा लागला. येथे शेतकऱ्याच्या अर्जाची अाॅनलाइन नोंदणी न झाल्यास अापण स्वतः जबाबदार राहू, खरेदी-विक्री संघ जबाबदार राहणार नाही, अशा प्रकारचा हा अर्ज लिहून घेण्यात आला अाहे. नाफेडच्या माध्यमातून अाधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी नावनोंदणीचे आवाहन करण्यात अाले होते. मालेगाव येथे खरेदी-विक्री संघात नावनोंदणी केंद्र अाहे. या ठिकाणी शेतकरी नावनोंदणीसाठी गेले असता त्यांच्याकडून खरेदी-विक्री संघाने विनंती अर्जच लिहून घेण्याचा प्रकार केला. या अर्जात तूर नोंदणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याची अाॅनलाइन नाव नोंदणी न झाल्यास त्यासाठी तो स्वतः जबाबदार राहील. यासाठी खरेदी विक्री संस्था जबाबदार नसेल असा मजकूर असलेला अर्ज लिहून घेण्यात अाला. ही बाब निदर्शनास अाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी तेथे जात विरोध केला. असा अर्ज लिहून घेणे योग्य नाही हे त्यांनी सांगितले. प्रतिक्रिया हा प्रकार समजताच नावनोंदणी केंद्रावर भेट दिली. या ठिकाणी खरेदी-विक्री संस्थेचे व्यवस्थापक अरुण इंगोले यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांकडून असा अर्ज घेणे योग्य नाही, तसेच नावनोंदणी करताना शेतकऱ्यांकडून प्रत्येकी १० रुपये घेण्यात येऊ नयेत, शासनाने नोंदणीची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी केली. - दामोदर इंगोले, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वाशीम  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com