Agriculture news in marathi farmers restart the onions auction in Solapur | Agrowon

सोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव मोडला

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दराने उच्चांक गाठल्याचे चित्र आहे. अशात बाजार समितीच्या आवारातून कांद्याच्या चोऱ्या वाढल्याचे कारण देऊन कांद्याचे वजन आधी करण्याऐवजी लिलावाच्या नंतर करावे, या मागणीसाठी खरेदीदार व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. ५) अचनाकपणे लिलाव बंद पाडले. पण शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या या भूमिकेचा निषेध करून थेट बाजार समिती आवारातच ठिय्या मारला. शेवटी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांची ही भूमिका हाणून पाडली. त्यानंतर लिलावाला सुरुवात झाली. 

सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दराने उच्चांक गाठल्याचे चित्र आहे. अशात बाजार समितीच्या आवारातून कांद्याच्या चोऱ्या वाढल्याचे कारण देऊन कांद्याचे वजन आधी करण्याऐवजी लिलावाच्या नंतर करावे, या मागणीसाठी खरेदीदार व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. ५) अचनाकपणे लिलाव बंद पाडले. पण शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या या भूमिकेचा निषेध करून थेट बाजार समिती आवारातच ठिय्या मारला. शेवटी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांची ही भूमिका हाणून पाडली. त्यानंतर लिलावाला सुरुवात झाली. 

लिलाव बंद पाडल्यानंतर व्यापारी, शेतकरी आणि बाजार समिती प्रशासन यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झडली. सुमारे दोन तास हा गोंधळ सुरू होता. या गोंधळाची माहिती मिळताच बाजार समितीचे सभापती विजयकुमार देशमुख यांनीही तातडीने बाजार समितीत धाव घेत व्यापारी-शेतकऱ्यांशी चर्चा केली. पण तोडगा निघत नव्हता. शेवटी शेतकऱ्यांच्या ठोस भूमिकेमुळे व्यापाऱ्यांची ही भूमिका हाणून पाडली. प्रशासनानेही चोऱ्या रोखण्याबाबत दक्षता घेऊच, पण लिलावाच्या आधीच कांद्याचे वजन होईल, असे ठणकावून सांगितल्याने तूर्त यावर पदडा पडला. 

महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या सीमेवर असलेली सोलापूर बाजार समिती कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या पंधरवड्यापासून बाजार समितीत कांद्याच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे. सध्या रोज २०० हून अधिक कांदा गाड्यांची आवक बाजार समितीत होते आहे. प्रतिक्विंटलचा पंधरा हजारांचा टप्पा ओलांडत, आता सर्वाधिक वीस हजारांच्या घरात कांदा पोचला आहे. त्यामुळे कांदा आणि सोलापूर बाजार समिती चर्चेत आली आहे. कांद्याचे लिलाव आणि व्यवहार सुरळीत सुरू असताना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास लिलावाच्या बोली सुरू झाल्या. मात्र अचानकच खरेदीदार व्यापाऱ्यांनी कांद्याचे वजन लिलावाआधी करण्याऐवजी लिलावानंतर करा, अशी मागणी करून लिलाव बंद पाडले होते. 

सचिव मोहन निंबाळकर यांनी व्यापाऱ्यांना बोलावत शेतकरी आणि व्यापारी अशी दोघांशी चर्चा सुरू केली. पण व्यापारी आडमुठी भूमिका घेत होते. कांद्याची चोरी वाढल्याने लिलावानंतरच वजन घेणे कसे योग्य आहे, असे सांगितले जात होते. पण लिलावाआधीच वजन होणे कसे योग्य आहे, हे शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले. अनेकदा वजन पाहून दूरवरचे शेतकरी निघून जातात, पण लिलाव होईपर्यंत थांबणे,शेतकऱ्यांना शक्‍य नाही, याकडेही या वेळी लक्ष वेधण्यात आले. 

बाजार समिती आवारात कांदा आणल्यानंतर कांद्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही संबंधित व्यापारी आणि बाजार समितीची आहे, त्यात शेतकऱ्यांचा दोष काय? उलट रात्ररात्रभर अनेक शेतकरी स्वतःच स्वतःच्या कांद्याची राखण करत बसतो, हेही सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. सभापती देशमुख यांनीही यावेळी व्यापारी-शेतकऱ्यांशी चर्चा केली. चोरी रोखण्याबाबत आवश्‍यक ती सुरक्षा पुरवू, सीसीटीव्ही कॅमेरे वाढवू, पण लिलावाच्या आधीच वजन होणे योग्य आहे, अशी स्पष्ट भूमिका घेतली. लिलाव सुरू करण्याची सूचना केली आणि लिलाव सुरू झाले. आता बाजार समितीकडूनही नव्याने परिपत्रक काढून लिलावाच्या आधीच वजन करण्याची लेखी सूचना व्यापाऱ्यांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

चोरी नेमकी होते कशी?

बाजार समितीच्या संपूर्ण आवाराला भिंतीचे कुंपण आहे. या आवारात जवळपास ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच मुख्य रस्त्यासह कांदा सेलहॉलमध्येही पुरेसे सुरक्षा रक्षक आहेत. सध्या काही कॅमेरे बंद असल्याचे सांगण्यात येते. पण कांद्याची चोरी नेमकी होते कशी? हा प्रश्‍न आहे. यामध्ये अधिक माहिती घेता, काही व्यापारी हमालांना हमालीच देत नाहीत, त्याऐवजी कांदा देतात, अशी माहिती समोर आली. त्यात बिगरनोंदणीकृत हमालांची संख्या अधिक आहे. त्यामुळे चोरी नेमकी कशी होते आणि कोण करते, हे तपासण्याची वेळ आली आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...