पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शनिवारी (ता. १४) मुलाखती होणार आहे.
अॅग्रो विशेष
'फार्माथॉन'मध्ये धावले शेतकरी; कापूस उत्पादक आणि जिनर्स आले एकत्र
औरंगाबाद: जागतिक कापूस दिनानिमित्त सोमवारी (ता. ७) औरंगाबाद येथे आयोजित ''फार्माथॉन''या जगातील पहिल्या शेतकरी मॅरेथॉनमध्ये विविध जिल्ह्यांतून आलेले महिला व पुरुष मिळून ३८४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. कॉटन फोरमच्यावतीने ''कॉटन गुरू'' च्या पुढाकारातून या मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
औरंगाबाद: जागतिक कापूस दिनानिमित्त सोमवारी (ता. ७) औरंगाबाद येथे आयोजित ''फार्माथॉन''या जगातील पहिल्या शेतकरी मॅरेथॉनमध्ये विविध जिल्ह्यांतून आलेले महिला व पुरुष मिळून ३८४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. कॉटन फोरमच्यावतीने ''कॉटन गुरू'' च्या पुढाकारातून या मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
देशातील कापूस क्षेत्राच्या तुलनेत महाराष्ट्रात ३३ टक्के तर महाराष्ट्रातील कापूस क्षेत्राच्या तुलनेत मराठवाठवाड्यात ४२ टक्के कापसाचे क्षेत्र आहे. सात हजार वर्षांचा इतिहास असलेल्या कापूस शेतीत बाराव्या शतकापर्यंत आपली जगात मक्तेदारी होती. मग अलीकडे आपली ही अवस्था का झाली. या अवस्थेतून कापूस शेतीला बाहेर काढण्यासाठी कापूस उत्पादकांपर्यंत तंत्रज्ञान, हवामान अंदाज, उत्तम बियाणे वाणांची माहिती सोबतच कापसाच्या स्मार्ट शेतीची पद्धत पोचविण्याचा प्रयत्न या मॅराथॉनच्या माध्यमातून केला गेला.
संपूर्ण देशात जवळपास ५० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांशी थेट संबध असलेल्या कॉटन गुरूने त्यासाठी डब्ल्युटीओच्या समन्वयातून पुढाकार घेतला. जागतिक स्तरावर अशाप्रकारे फक्त शेतकऱ्यांसाठीची मॅराथॉन पहिलीच असल्याचा दावा आयोजकांनी केला.
शेतकऱ्यांनो एकत्र येऊन कापूस विका,
अधिक दर मिळेल ! जिनर्सकडून विश्वास... पहा video
कापसाचे नेमके महत्त्व काय, त्याची उपयुक्तता काय यावर प्रकाश टाकण्याचे काम या मॅराथॉनच्यानिमित्ताने केले. यामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना कापूस उत्पादने आणि उप उत्पादनाचे वितरण कीटच्या माध्यमातून केले गेले. बीएसई, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टेक्स्टाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि बियाणे कंपन्या, कृषी निविष्ठा कंपन्या, फार्मटेक कंपन्या, जिनर्स आणि स्पीनर्स अशा संपूर्ण कॉटन सप्लाय चैन सारख्या भारतातील बहुतेक प्रमुख संघटना कापूस आणि कापूस उत्पादकांना पाठिंबा देण्यासाठी यामध्ये सहभाग नोंदविला. या मॅराथॉनमध्ये विविध भागांतील ३२५ पुरुष व ५९ महिला कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
पुरस्कार वितरणाला कॉटन गुरूचे मनिष डागा, जिनिंग असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग राजपाल, टेक्स्टाईल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष हेमंत सोनारे, अमृत पॅटर्नचे अमृतराव देशमुख, मनजित कॉटनचे रसदीप चावला आदींची उपस्थिती होती. स्पर्धेच्या नियोजनात सीएसएमस कॉलेजच्या कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग दिला.
सीसीआयने दिले दहा वेचणी यंत्र
फार्माथॉनमध्ये सहभागी विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांनांपैकी दहा शेतकरी उत्पादक कंपन्यांना भारतीय कपास निगम लिमिटेडच्यावतीने दहा ॲटोमॅटीक वेचणी यंत्र देण्यात आले. शिवाय या वेळी शेतकऱ्यांना सीसीआयच्यावतीने कापसाचे सीसीआयच्या विविध खरेदी केंद्रांवरील दर यासह विविध इत्यंभूत माहिती देणाऱ्या ॲपची माहिती देण्यात आली. या वेळी सीसीआयचे सचिन वर्मा व मनिष रावत या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
- 1 of 436
- ››