नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
ताज्या घडामोडी
शेतकरी, ग्रामीण भागाचे राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष
राज्याचा अर्थसंकल्प आज (ता. ८) अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार विधानसभेत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे शेतकरी आणि ग्रामीण भागाचे लक्ष लागून आहे.
पुणे : राज्याचा अर्थसंकल्प आज (ता. ८) अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार विधानसभेत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे शेतकरी आणि ग्रामीण भागाचे लक्ष लागून आहे. अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण विकासासाठी भरीव तरतूद करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. उद्योग, व्यवसाय विस्कळीत झाल्यामुळे महसूल घटला आहे. शेतीमाल खरेदी-विक्री प्रक्रिया कोलमडून पडली आहे. परिणामी, शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. लॉकडाउनमुळे शेतीमाल शेतातच कुजून गेला. त्यात भर म्हणून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कर्जमाफी, कर्ज फेडणाऱ्यांना मिळणारा प्रोत्साहन निधी रखडला आहे. योजनांच्या अनुदानाचीही प्रतीक्षा आहे.
राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे रस्ते वाहून गेलेत. रस्त्यांच्या दुरुस्तीसह ग्रामविकासासाठी निधीची तरतूद व्हावी, अशी अपेक्षा ग्रामीण जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया
लॉकडाउन आणि अवकाळीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यातून सरकारी मदतीशिवाय सावरणे शक्य नाही. शेतीसाठी भरीव मदतीची गरज आहे.
- दिनकर गुजले, द्राक्ष बागायतदार. मळणगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली
- 1 of 1096
- ››