नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ, युरिया मिळेना

युरियाचा मुबलक साठा असल्याचे कृषिमंत्री व कृषी विभाग सांगतो. मात्र, युरिया जातो कुठे? युरियाच्या कृत्रिम टंचाईबाबत कडक कारवाई करा. योग्य नियोजन नाही. अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करावी - योगेश रायते, शेतकरी,खडक माळेगाव, ता. निफाड खतांच्या काळ्या बाजाराची तक्रार करुन पुरवठ्याबाबत पाठपुरावा केला. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांबाबत उदासिनता आहे. व्यापाऱ्यांना झुकते माप मिळते. जाब विचारुनही काही परिणाम दिसून येत नाही. - किरण चरमळ, तालुका संघटक, प्रहार शेतकरी संघटना, येवला
Farmers rush in Nashik district, urea not available
Farmers rush in Nashik district, urea not available

नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची मात्रा आवश्यक आहे. इतर खतांची उपलब्धता आहे. मात्र मागणीच्या तुलनेत युरियाचा अद्यापही तुटवडा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. तरीही युरिया मिळत नाही. युरिया मुबलक असल्याचा दावा कृषी विभागाचा आहे. मग उपलब्ध युरिया नेमका कुठे जातोय, हा प्रश्न आहे. युरिया नेमका कधी उपलब्ध होणार, याच्या प्रतिक्षेत शेतकरी असून त्यांच्यामध्ये संताप आहे.    

जिल्ह्यात मका, सोयाबीन, कापूस या पिकांना वाढीच्या अवस्थेत युरियाची गरज आहे. मात्र तो उपलब्ध होत नाही.  खते विक्रेत्यांची मनमानी व हितसंबंध जपण्याचा फटका गरजू शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक दुकानदारांनी दर व साठा फलक लावले नसल्याचे अलीकडेच कृषिमंत्र्यांनी बोलवून दाखवले. यावर काही ठिकाणी गुणवत्ता नियंत्रण विभागाने कारवाई केल्या. मात्र तरीही काही विक्रेते ही बाब गांभीर्याने घेत नसल्याची स्थिती आहे. 

शेतकऱ्यांना इतर खतांची सक्ती केली जात आहे. पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे व जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या तालुक्यांमध्ये युरिया उपलब्ध करण्यासाठी चकरा माराव्या लागत आहे. काही ठिकाणी युरिया टंचाई सांगत दोन इतर खतांच्या गोण्या घेतल्यानंतर १ युरियाची गोणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे लिंकिंगचा सर्रास प्रकार सुरू असताना यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष आहे. 

चढ्या दराने विक्री सुरूच

मागील सप्ताहात युरिया मिळत नव्हता. मात्र तो मिळतोय, पण विक्री ३३० रुपयांपर्यंत होत आहे. हा प्रकार मालेगाव, निफाड, येवला व चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी बोलून दाखविला आहे. त्यातच बिले देताना टाळाटाळ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई-पॉस मशीन बंद असल्याने आधारकार्ड घेऊन युरिया व इतर खते देणे बंधनकारक आहे. मात्र, असे होत नसल्याबाबत कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com