agriculture news in marathi, Farmers to sale grapes by their own in Nashik | Agrowon

शिवडी, सारोळे गावे करणार स्वत:च रोख द्राक्ष विक्री
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

शिवडी, जि. नाशिक  : द्राक्ष उत्पादकांना द्राक्षमालाचे पैसे रोखीने मिळत नाहीत. व्यापारी पलायनाचा विदारक अनुभव जिल्ह्याला आहे. यावर उपाय योजण्यासाठी शिवडी येथील द्राक्ष उत्पादकांनी स्वत:चा द्राक्षमाल रोखीनेच विक्री करण्याची शपथ घेतली आहे. आपल्या मालाच्या रोख विक्रीचा हा ‘शिवडी पॅटर्न’ इतरही गावांनी अवलंबावा, अशी अपेक्षा व्यक्त केली असतानाच मंगळवारी (ता. २७) सारोळे खुर्द येथील ग्रामसभेत रोख विक्रीसह अडत न देण्याबाबत ठराव करण्यात आला. आज, बुधवारी (ता. २८) उगाव येथे सकाळी ९ वाजता याच विषयावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात येत आहे.  

शिवडी, जि. नाशिक  : द्राक्ष उत्पादकांना द्राक्षमालाचे पैसे रोखीने मिळत नाहीत. व्यापारी पलायनाचा विदारक अनुभव जिल्ह्याला आहे. यावर उपाय योजण्यासाठी शिवडी येथील द्राक्ष उत्पादकांनी स्वत:चा द्राक्षमाल रोखीनेच विक्री करण्याची शपथ घेतली आहे. आपल्या मालाच्या रोख विक्रीचा हा ‘शिवडी पॅटर्न’ इतरही गावांनी अवलंबावा, अशी अपेक्षा व्यक्त केली असतानाच मंगळवारी (ता. २७) सारोळे खुर्द येथील ग्रामसभेत रोख विक्रीसह अडत न देण्याबाबत ठराव करण्यात आला. आज, बुधवारी (ता. २८) उगाव येथे सकाळी ९ वाजता याच विषयावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात येत आहे.  

शिवडी येथे झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखी ठराव करत संघटन अधिक व्यापक करण्याची मोहीमच उघडली आहे. व्यापारी अत्यल्प बाजारभावावर उधारीवर खरेदी करतो अन् व्यापारात तोटा आल्याचे सांगत ठरलेला बाजारभावही कमी करतो. जिल्ह्यात द्राक्ष व्यापाऱ्यांकडून वापसीच्या नावाखाली द्राक्ष उत्पादकाला दोन टक्के कपात करत पैसे दिले जातात. याबाबत आता द्राक्ष उत्पादक युवा पिढीने यावर उपाय योजण्यासाठी नियमावली करण्याचे निश्‍चित केले असून, शिवडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली.

याप्रसंगी सरपंच गणपत क्षीरसागर, माजी सरपंच प्रमोद क्षीरसागर, भगीरथ शिंदे, नामदेव दौंड, शिवाजी क्षीरसागर, माणिक क्षीरसागर, भाऊसाहेब बोरसे, हनुमंत जेऊघाले, वाळू क्षीरसागर, सहादू क्षीरसागर, भास्कर क्षीरसागर, दामू क्षीरसागर आदींसह द्राक्ष उत्पादक उपस्थित होते. प्रस्ताविकात ॲड. रामनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात द्राक्ष उत्पादन कमी असून सांगली, जालना, कसमादे यांसारख्या ठिकाणी व्यापारी रोख स्वरूपात द्राक्षमालाचे पैसे कोणतीही कपात न करता अदा करतात, असे स्पष्ट करून बैठकीचा उद्देश सांगितला. महेश क्षीरसागर यांनी सांगली, जालना भागांत संबंधित व्यापाऱ्याने कोणतीही कपात न करता रोख पैसे दिले नाही तर द्राक्षमाल शेतातून नेऊ दिला जात नाही. सर्व शेतकरी संघटित असल्याने द्राक्षमालाचे पैसे रोख मिळतात असे स्पष्ट केले.

नवनाथ शिंदे यांनी द्राक्ष व्यापारी पॅकिंगपासून तर बाजारपेठेत जाईपावेतोचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी मारत असून, ही बाब चुकीची असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर प्रवीण क्षीरसागर, माजी सरपंच भगीरथ शिंदे, माजी चेअरमन नामदेव दौंड आदींनी द्राक्ष व्यापार व बाजारपेठेत मिळणारे बाजारभाव शेतकऱ्यांची फसवणूक आदींवर मनोगतातून संघटित होण्याची गरज व्यक्त केली. या वेळी सर्व ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी एकजुटीने द्राक्षमाल रोख स्वरूपात कोणतीही कपात न करता घेणाऱ्या व्यापाऱ्यास विक्री करण्याचा ठराव एकमताने मांडला. त्यास सर्वच द्राक्ष उत्पादकांनी पाठिंबा व्यक्त केला. याबाबत गावागावात जनजागृती करण्याचेही निश्‍चित केले. याप्रसंगी शेतकरी उपस्थित होते.

सारोळे खुर्दच्या ग्रामसभेतील रोख विक्रीचे ठराव

  • रोख पेमेंट असल्याशिवाय व्यवहार करणार नाही.
  • १ ते २ टक्के वापसी किंवा अडत वसूल करू देणार नाही
  • चेक किंवा आरटीजीएसच्या व्यवहारात कटती करू नये
  • ठरल्यानंतरही भाव पाडून मागणाऱ्यांशी व्यवहार करू नये
  • व्यापाऱ्यांकडील आधार कार्ड, पॅन कार्डची खातरजमा करा

नाशिकच्या सर्व गावांत होणार ठराव
शिवडी, सारोळे खुर्द पाठोपाठ आज (ता. २८) उगाव येथे सकाळी ९ वाजता याच विषयावर ग्रामसभा होत आहे. या सभेत आपला शेतीमालाच्या रोख विक्रीबाबत ठराव करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांकडून वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवून दर पाडले जात असताना त्या विरोधात शेतकरी एकत्र येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये विशेष ग्रामसभेतून याबाबत ठराव केले जाणार आहे. राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या मार्फत याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. द्राक्ष व्यवहारातील फसवणूक टळावी तसेच रोख दर मिळावे, यासाठी सर्व द्राक्ष उत्पादकांनी आपापल्या गावात एकत्र यावे. असे आवाहन द्राक्ष बागायतदार संघाच्या मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी केले.

दोन टक्के कपात चुकीची
जिल्ह्यात द्राक्षमालाचा व्यवहार करताना प्रथम रोख पेमेंटची बोली होते. एक-दोन दिवस पेमेंट रोख दिले जाते, नंतर आजचे उद्या असे करत पेमेंट थकविले जाते. अनेक दिवस थकविल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे देताना एकूण रकमेच्या दोन टक्के कपात करून पैसे देऊ करतात. एकटाच शेतकरी नाइलाजाने ते सहन करतो; मात्र यावर पायबंद घालण्यासाठी शिवडीकरांनी नवीन क्रांतीची मशाल पेटविली आहे.
- प्रमोद क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक शेतकरी
 

इतर अॅग्रो विशेष
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...
राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...