Agriculture news in Marathi, Farmers in Sangli district get sugarcane | Agrowon

सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना लागली उसाची गोडी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

सांगली ः गेल्या तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात घट झाली होती. यंदाही पाणीटंचाईमुळे उसाच्या क्षेत्रात घट होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली. गेल्या वर्षी ८९ हजार ९१८ हेक्टर उसाचे क्षेत्र होते. यंदा उसाच्या क्षेत्रात सहा हजार हेक्टरने वाढ झाली असून ९५ हजार ८२७ हेक्टर इतके झाले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप पूर्वतयारी सुरू केली आहे.

सांगली ः गेल्या तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात घट झाली होती. यंदाही पाणीटंचाईमुळे उसाच्या क्षेत्रात घट होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली. गेल्या वर्षी ८९ हजार ९१८ हेक्टर उसाचे क्षेत्र होते. यंदा उसाच्या क्षेत्रात सहा हजार हेक्टरने वाढ झाली असून ९५ हजार ८२७ हेक्टर इतके झाले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप पूर्वतयारी सुरू केली आहे.

यंदा दुष्काळाची दाहकता, आणि पाण्याची कमतरता यामुळे जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता होती. परंतु शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन प्रणाली वापरली आहे. यामुळे ऊस पिकाला पाणी कमी लागू लागले आहे. परिमाणी कमी पाण्यात जास्तीत जास्त उसाचे उत्पादन घेण्यासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता पाहून शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. त्यातच एफआरपीचा कायदा कडक करण्यात आला आहे. साखर आयुक्तांनी हा कायदा कडक केल्याने कारखानदारांनी शेतकऱ्यांना पैसेही देऊ केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाची गोडी लागली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत वाढ
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही ऊस क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत सहा हजार हेक्टरने वाढ झाली आहे. आडसाली आणि खोडवा या हंगामातील उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. मात्र, गेल्या वर्षी सुरू हंगामातील उसाचे क्षेत्र १० हजार १८५ हेक्टर होते. परंतु यंदा या हंगामातील १ हजार ९७७ हेक्टरने कमी होऊन ते ८ हजार २०८ हेक्टर इतके आहे.

कारखान्यांची गाळप तयारी पूर्ण
जिल्ह्यात खासगी आणि सहकारी १६ साखर कारखाने आहेत. हे कारखाने यंदाही पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. त्यासाठी कारखान्यांनी गाळपाची पूर्ण तयारी केली आहे. अनेक कारखान्यांनी तोडणी-वाहतूक करारही पूर्ण केले आहेत. ऊस नोंदणीचेही काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली.

यंदाच्या हंगामात गाळपासाठी सज्ज ऊस क्षेत्र
ऊस क्षेत्र (हेक्टर)
आडसाली ३२ हजार ३२३
पूर्व हंगामी १७ हजार २५१
सुरू ८ हजार २०८
खोडवा ३७ हजार ६४५
एकूण ९५ हजार ८२७
गतवर्षीचे ऊस क्षेत्र
ऊस क्षेत्र हेक्टर
आडसाली २९ हजार १४९
पूर्व हंगामी १७ हजार २८१
सुरू १० हजार १८५
खोडवा ३३ हजार  ३०३
एकूण ८९ हजार ९१८

 

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...