सांगोल्यातील शेतकऱ्यांचे पुण्यात बेमुदत धरणे

सांगोल्यातील शेतकऱ्यांचे पुण्यात बेमुदत धरणे
सांगोल्यातील शेतकऱ्यांचे पुण्यात बेमुदत धरणे

सांगोला, जि. सोलापूर : नीरा उजवा कालवा शाखा पाचवरील पाणीवापर संस्थांच्या पदाधिकारी, लाभधारक शेतकऱ्यांनी मंजूर पाणी मिळावे, यासाठी पुण्यातील सिंचन भवनासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

हक्काचे पाणी अनेक राज्यकर्त्यांनी पळवून नेले. अधिकाऱ्यांच्या करामतीमुळे कागदोपत्री सांगोला तालुका लाभार्थी दाखविला गेला. परंतु, आता युवक शेतकरीवर्ग जागा झाला आहे. ५० वर्षे दुष्काळी चटके सोसलेल्या शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या राज्यकर्त्यांनी बरबाद केल्या. त्यामुळे आमच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, या मागणीसाठी युवक शेतकरी आंदोलनात उतरले आहेत. 

प्रकल्पीय तरतुदीनुसार हक्काचे पाणी मिळावे, उन्हाळी हंगाम २०१९ मध्ये लाभक्षेत्रातील एक एकरही भिजले नाही. त्यामुळे डाळिंब, द्राक्षे, फळबागा उद्‌ध्वस्त होत आहेत. त्यामुळे उन्हाळी आवर्तनाच्या २०१८-१९ हंगामाचे पाणी सोडावे, पुढील हंगामापासून एनआरबीसी ब्रॅंच तीन बरोबरच सांगोला शाखा कालवा ब्रॅंचच पाचचे आवर्तन सुरू करावे, प्रलंबित कालवा हस्तांरित प्रक्रिया संबंधित संस्थांनी पूर्ण करावी, अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत.

नीरा उजवा कालवा सल्लागार समितीमध्ये पाणीवापर संस्थांना प्रतिनिधित्व मिळावे, उन्हाळी हंगाम २०१९ पाणीवाटपात झालेल्या अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करावी, सांगोला शाखा कालव्याचे अपूर्ण वितरकांचे अस्तरीकरण करावे, सर्व वितरकांवर पाणी मोजणी यंत्रे बसविण्यात यावी, तसेच धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर अतिरिक्त पाणी सांगोल्याला मिळावे, अशा मागण्याही शेतकऱ्यांनी केल्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com