सांगलीतील कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान कक्ष होणार सुरू

सांगलीतील कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान कक्ष होणार सुरू
सांगलीतील कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान कक्ष होणार सुरू

सांगली : शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी विभागाच्या सर्व कार्यालयात शेतकरी सन्मान व मागदर्शक कक्ष स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या कक्षातून शेतकऱ्यांच्या अडचणी, तांत्रिक समस्या, योजनांचे लाभार्थी निवड व विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  शेतमालाची उत्पादकता व उत्पन्नात सातत्य ठेवण्यासाठी व विविध योजनांच्या अंमलबजावणीत समन्वय साधून काम करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यांची समितीही स्थापन करण्यात येणार आहेत. कृषी विकासात शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून ही समिती काम करेल. कृषी विभागाशी संबंधित इतर खात्यांचे प्रतिनिधी, अग्रणी बॅंक, सहकार उपनिबंधक व किमान तीन प्रगतिशील शेतकरी यांचाही समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या समितीच्या बैठकीस विशेष निमंत्रित म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी व प्रांताधिकारी यांना उपस्थित रहाणे बंधनकारक आहे. दर तीन महिन्यांनी या समितीची बैठक होईल, त्यात हवामान, पीक परिस्थिती, उत्पादकता लक्षांक, विपणन, खते, बियाणे यांचा पुरवठा, पीक कर्जे, वीज जोडणी प्रकरणे आदी प्रश्‍नावर चर्चा अपेक्षित आहे. शेतकरी सन्मान कक्षाच्या प्रमुखपदी अभ्यासू व सौजन्यशील कर्मचाऱ्यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाईल. त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे ज्या शाखेकडे काम आहे त्या शाखेतील संबंधितांशी संपर्क साधून आवश्‍यक ती माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.  या कक्षाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक आहे. त्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करून त्याठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, शेतीविषयक मासिके, वर्तमानपत्र तसेच अंमलबजावणी सुरू असलेल्या योजनांची परिपत्रके वाचण्यास मिळतील. समिती सदस्य...  तहसीलदार (अध्यक्ष), तालुका कृषी अधिकारी (सचिव), सदस्य- गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, जलसिंचन विभागाचे उपअभियंता, कृषी विद्यापीठाचे संशोधक, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मत्स्य, रेशीम, खादी, ग्रामोद्योग विभागाचे प्रतिनिधी, महावितरण अभियंता, अग्रणी बॅंक प्रतिनिधी, सहायक निबंधक सहकारी संस्था, बाजार समिती सचिव व तीन प्रगतिशील शेतकरी त्यात एक महिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com