सातारा जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला, लाखोंचे नुकसान

द्राक्षाचे पीक वादळी पावासाने गेले. द्राक्षास प्रतिकिलो ११० रुपये दर ठरला होता. मात्र घड फुटल्याने दहा रुपये किलो द्राक्ष विकावे लागले आहे. प्रक्रियासाठी द्राक्ष खरेदी बंद झाल्याने द्राक्ष उकिरड्यात टाकावी लागली आहेत. यामुळे एकरी दहा लाखापेक्षा अधिक तोटा सहन करावा लागला आहे. - विठ्ठल सस्ते, निरगुडी, ता. फलटण, जि. सातारा.
सातारा जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला, लाखोंचे नुकसान
सातारा जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला, लाखोंचे नुकसान

सातारा : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील शेतकरी हतबल झाले आहेत. पश्चिमेकडील सोयाबीन, भात, खरीप ज्वारी, भुईमूग तर पूर्वेकडील द्राक्ष, डाळिंब, बाजरी, ज्वारी या पिकांचे महापूर, अतिवृष्टी, कमी कालवधीत जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी निवडणुकीत गुंतल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दिवाळीसारखा महत्त्वाचा सण आमच्यासाठी कडू झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

जिल्ह्यात शेतकरी चार बाजूंनी अडचणीत आला आहे. खरिपाच्या सुरवातील पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम लांबला. उशिरा का होईना शेतकऱ्यांनी धाडस करत खरिपातील पेरण्या केल्या. जिल्ह्यात ९० टक्क्यांवर पेरणीची कामे झाली होती. दुष्काळी तालुक्यात अतिटंचाई, गावात पेरण्या न झाल्यामुळे दहा टक्के क्षेत्र नापेर राहिले होते. पावसाच्या आगमनाने पिकांच्या वाढी चांगल्या असतानाच पश्चिम भागात अतिपाऊस झाल्याने धरणे भरली.

नदीच्या पाणी पात्रात पाण्याची झालेली वाढ व धरणातून करण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग यामुळे कृष्णा, कोयना या प्रमुख नद्यांना महापूर आल्याने शेकडो क्षेत्रापेक्षा जास्त पिकाखालील क्षेत्र पाण्याखाली गेले. तसेच मोठ्या प्रमाणात पिकांत पाणी साचले. यामुळे पिके कूजून कोट्यावधी फटका सहन करावा लागला. प्रशासन व नेत्यांकडून यांची पाहणी करून भरपाई मिळालेली नसल्याने शेतकरी पिचला गेला आहे. यातून बाहेर पडत असतानाच पावसाने पुन्हा दणका दिल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

अतिवृष्टी, महापुरातून वाचलेली पिके परतीचा आणि त्यानंतर वादळी पावसाने झोडपून काढल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावरील काढणीला आलेली पिके बाधित झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उरल्या सरल्या अपेक्षाही जवळपास संपत आल्या आहेत.

प्रमुख पिके गेली

जिल्ह्यात मागील दहा वर्षांपासून खरिपात सोयाबीन प्रमुख पीक झाले आहे. दसरा, दिवाळीच्या तोंडावरा पैसे उपलब्ध करून देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जात असल्याने या पिकाच्या क्षेत्रात प्रत्येक वर्षी वाढ झाली आहे. याही हंगामात ६० हजार हेक्टवर सोयाबीनची पेरणी झाली. पिके गेल्या तीन आठवड्यापासून काढणीला आली होती. मात्र या काळात परतीचा आणि वादळी पाऊस सुरू राहिल्याने सोयाबीन झडले आहे. काही ठिकाणी उगवले, काळे पडले आहे.

काढणी झालेल्या खपिकांवर डाग पडल्याने हमीभावापेक्षा एक हजार ते १२०० रुपये कमी दराने सोयाबीनीची खरेदी केली जात आहे. नाडलेल्या शेतकऱ्यांची गरज ओळखून सर्रास ठिकाणी व्यापाऱ्यांकडून लुटीचे प्रकार सुरू असतानाही जिल्ह्यात अजूनही हमीभाव केंद्रे सुरू झालेली नाहीत. भात पीक वाऱ्यामुळे पडले असल्याने कुजले आहे. खरीप ज्वारी काळी पडली आहे. 

द्राक्षाचे कोट्यवधीचे नुकसान

फलटण तालुक्यातील खडकी, हिंगणगाव, निरगुडी, गिरवी, धुमाळवाडी आदी गावांत एक दिवसात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे या तालुक्यातील २०० हेक्टरपेक्षा द्राक्ष पिकांवर डाग तसेच घड फुटले आहेत. यामुळे द्राक्षाचे कोट्यवधी रुपये नुकसान झाले आहे. या नुकसानीची आमदार दीपक चव्हाण यांनी पाहणी केली आहे. हा अपवाद वगळता परतीच्या व वादळी पावसाने झालेल्या नुकसानीकडे लोकप्रतिनिधींनी पाठ केली आहे. या तालुक्यातील कांदा, डाळिंब यांचेही मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षासाठी एकरी भांडवली खर्च व अपेक्षित उत्पादन बघता एकरी दहा लाखांवर नुकसान झाले आहे. 

बळिराजाची दिवाळी शेतात

सर्वात उत्साह आणि आनंदाचा दिवाळीसारखा प्रमुख सण हा बहुतांशी शेतकऱ्यांचा शेतात गेला आहे. हात लागतील ती पिके काढणे, किंवा वाया गेली पिके शेतातून काढून रब्बी हंगामात उत्पादन मिळेल, यासाठी शेते तयार करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. पिकांचे पैसे न झाल्याने शेतकऱ्यांनी दिवाळी निरुत्साहात गेली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com