अॅग्रोवन कृषी प्रदर्शनामुळे आधुनिक तंत्रज्ञान पहायला मिळाले

शेततळ्याच्या कागदाची माहिती मला हवी होती, त्याशिवाय दूध व्यवसाय व पूरक शेती उद्योगाची माहिती घेतली. त्याशिवाय करारपद्धतीच्या शेतीची माहिती मला आवडली, त्याचाही विचार मी करतो आहे. - अमोल भानुसे, भुसनेर, ता. पैठण, जि. औरंगाबाद
agri exhibition
agri exhibition

औरंगाबाद ः  ‘‘कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार होत आहे. सतत पारंपरिक पीक घेत असताना फळबाग लागवडीसाठीचाही पर्याय मिळाला.त सेच मजूरटंचाईवर मात करण्यासाठी ट्रॅक्टरचलित विविध अवजारांविषयी, दूध काढणी यंत्र, रानडुकरांचा बंदोबस्त, विविध अवजारे यासह शेतीविषयक माहिती प्रदर्शनातून मिळाली,’’ अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.  प्रतिक्रिया कृषी अवजारांची चांगली माहिती मिळाली. त्यात ट्रॅक्टरपासून अगदी छोट्या अवजारांपर्यंतची माहिती आणि प्रात्यक्षिके पाहायला मिळाली. तसेच, खते-बियाण्यांची माहिती आणि सेंद्रिय शेतीची माहिती फायदेशीर आहे. शेतकरी गटांची उत्पादनेही उपयुक्त अशी होती. - अशोक दाभाडे,  करमाड, ता. औरंगाबाद शेतीमध्ये आम्ही विविध प्रयोग करतो आहोतच; पण महिलांसाठीच्या उद्योगांची, बचत गटांची माहिती उपयुक्त वाटली. त्यातही सेंद्रिय पद्धतीची आणि घरच्या घरी सहज करता येऊ शकतील, अशी उत्पादने खूपच चांगली वाटली. एकूणच प्रदर्शनाचे नियोजन आणि विविध स्टॅाल्स माहितीपूर्ण आणि महत्त्वाचे होते. - शारदा कागदे,  लाखेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद

मला कमी पाण्यावरील फळबागांची माहिती हवी होती. आमच्याकडे पाण्याचा प्रश्न आहे, त्यासाठी मी आलो होतो. प्रदर्शनात पेरू, सीताफळाची माहिती मिळाली, त्यांच्या वाणांचीही माहिती मिळाली. प्रदर्शन खूपच चांगले वाटले. नवीन माहिती आणि काही अवजारेही पाहता आली.  - दत्तात्रेय जाधव, करडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना माझी २४ एकर शेती आहे. शाश्वत उत्पन्नासाठी फळपिकांवर भर दिलेला आहे. आंबा, पपई, लिंबू, पेरू आदी फळपिकांची लागवड केलेली आहे. सीताफळाची लागवड करायची आहे. त्यासाठी कृषी प्रदर्शनात आलो आहोत. - मनोज भाले,  सुरपिंपरी, ता. जि. परभणी

‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार शेतकऱ्यांमध्ये होत आहे. कृषी प्रदर्शनाच्या आयोजनामुळे कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळत आहे. - रोषण करेवार, कृषी सहायक, परभणी

भाजीपाला पिकाचे उत्पादन घेत असतो. येत्या काळात सीताफळाची लागवड करायची आहे. त्यासाठी सीताफळाच्या दर्जेदार रोपांची माहिती घेण्यासाठी गावाकडून तीन जण मिळून कृषी प्रदर्शनात आलो. हातचलित कृषी अवजारांची उपयुक्त माहिती मिळाली. - सटवाजी ताठे,  कौडगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी

‘अॅग्रोवन’चे अॅप सहा महिन्यापूर्वी डाऊनलोड केले आहे. त्यामुळे शेतीविषयक घडामोडी, बाजारभाव, हवामानाची माहिती मिळते. ‘अॅग्रोवन’ अॅपमार्फतचा कृषी प्रदर्शनाची माहिती मिळाली. दूध काढणी यंत्र, रानडुक्कारांचा बंदोबस्त, विविध अवजारे, यासह शेतीविषयक भरपूर माहिती प्रदर्शनातून मिळाली. - उद्धव भरकडे,  नांदगाव, ता. लोहा, जि. नांदेड

आजवर खरीप आणि रब्बी पिकांचे उत्पादन घेत आलो आहे. यापुढील काळात शाश्वत उत्पन्नासाठी फळपिकांची लागवड करायची आहे. त्यासाठी माहिती घेण्यासाठी कृषी प्रदर्शनासाठी मित्रांसोबत आलो आहोत. चांगली माहिती मिळाली.  - विकास जैन, परभणी माझी पंधरा एकर शेती आहे. त्यापैकी तीन एकरवर लिंबाची लागवड आहे. कांदा, गहू, हरभरा पिकांचे उत्पादन घेत असतो. गावातील शेतकरी मित्र मंडळी मिळून कृषी प्रदर्शनासाठी आलो आहोत. शेतीकामांसाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टरव्दारे शेती होत आहे. ट्रॅक्टरचलित विविध अवजारे, ठिबकचे आधुनिक तंत्रज्ञान याबाबत माहिती ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनातून मिळाली. - संजय वाडेकर,  विहीगाव, ता. खामगाव, जि. बुलडाणा

शेतीमध्ये आज ठिबक संचाला फार महत्त्व आले आहे. ठिबकमध्ये काय नवीन आहे, याची माहिती हवी होती. काही स्टॅाल्सवर ती मिळाली. त्याशिवाय सेंद्रिय शेतीची माहिती घेतली. तसेच, सेंद्रिय पद्धतीची काही उत्पादनेही इथे पाहायला मिळाली. - मोनीराज घोरपडे,  भैरवाडी, ता. नेवासा, जि. नगर

माझी ११ एकर शेती आहे. ऊस, कपाशी, कांदे उत्पादन घेत असतो. कृषी प्रदर्शनामध्ये फळपिकांची रोपे, भाजीपाला, शेती पिकांच्या सुधारित वाणांची माहिती मिळाली. ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाच्या आयोजनामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडत आहेत. - मुकुंदा पाटील,  गणेशपूर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com