agriculture news in Marathi farmers says got advance agriculture practices form agriculture exhibition Maharashtra | Agrowon

अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : अद्ययावत प्रयोगांच्या माहितीने समाधानी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

शेतीविषयक ज्ञान आणि माहिती अद्ययावत करण्यासाठी कृषी प्रदर्शनास आवर्जून भेट देत असतो. ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनामध्ये माती परीक्षण, शेतीपूरक दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, रेशीम शेती, शेती पिके तसेच फळपिकाच्या लागवड तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. ‘अॅग्रोवन’ने शेतकऱ्यांना माहितीचा खजिना उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
- ज्ञानोबा बंदुके, गुत्ती, ता. उदगीर, जि. लातूर

औरंगाबाद ः ‘‘‘सकाळ-ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनातून जगभरात सुरू असलेल्या शेतीतील अद्ययावत प्रयोगांची माहिती मिळाली. पिकांच्या नवीन वाणांच्या माहितीमुळे पारंपरिक पिकांना पर्यायही मिळाला. सोबतच शेतीतील अद्ययावत यंत्रे, पूरक व्यवसायांबद्दलची माहिती, शेततळे, फळबाग लागवड याविषयीची माहिती मिळाली. आधुनिक आणि प्रयोगशील शेती करण्यासाठी प्रदर्शनातून ज्ञान मिळाले,’’ अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. 
 

माझी बारा पैकी सात एकर शेती बागायती आहे. दुग्ध उत्पादनासाठी योग्य पशुआहार, रेशीम शेती, शेततळे निर्मिती आदी माहिती मला निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनास भेट द्यावी.
- गोपाळ पांगरे, चिंचोली, ता. उदगीर, जि. लातूर

‘अॅग्रोवन’मधून कृषी प्रदर्शनाची माहिती मिळाल्यानंतर गावातील मित्रांसोबत प्रदर्शन पाहण्यासाठी आलो. फळबाग लागवड, बैलचलित, स्वयंचलित कृषी अवजारे यांसह आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, याबाबतची माहिती कृषी प्रदर्शनातून मिळाली.
- माधव लोंढे, सती पांगरा, ता. वसमत, जि. हिंगोली

आमच्या कुटुंबाची सहा एकर शेती आहे. हळद, ऊस आदी प्रमुख पिकांचे उत्पादन घेत असतो. हळद प्रक्रिया, ट्रॅक्टरचलित कृषी अवजारे, शेतीपूरक विविध उद्योगाची माहिती ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनातून मिळाली. 
- प्रशांत दळवी, कुरुंदा, जि. हिंगोली

प्रदर्शन खूपच आवडले, नावीन्यपूर्ण माहिती मिळाली, तसेच आधुनिक तंत्रज्ञान देणाऱ्या मशिनरी पाहता आल्या. त्याशिवाय विविध प्रकारच्या देशी बियाण्यांच्या वाणाची माहिती मिळाली. सीताफळ आणि पेरूसारखे वाणही पाहता आले. 
- अतुल कौठुळे, देऊळगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद

मला सेंद्रिय शेतीची माहिती हवी होती. त्याशिवाय ड्रिप तंत्रज्ञानात नवे काय आले आहे, हे पाहायचे होते. बऱ्यापैकी माहिती मिळाली. विशेषतः शेतीपूरक उद्योग आणि यांत्रिकीकरणातील यंत्रेही उपयुक्त अशीच होती. प्रदर्शनात नवीन माहिती आणि तंत्रज्ञान पाहता आले, याचे समाधान वाटले. 
- कैलास व्हसनाळे, नरंगल, ता. देगलूर जि. नांदेड

आमची गावाकडे चार एकर शेती आहे. ज्वारी, कांदा अशी पिके घेतो आहोत. पण, आता कमी पाण्यावरील सीताफळ, पेरू यांसारख्या पिकाची लागवड करण्याचा विचार करतो आहोत. त्यासाठी आले होते. सीताफळ, पेरू आणि अंजिराच्या काही वाणांची माहिती मिळाली. त्याशिवाय कमी मनुष्यबळावर काम करणारी विविध उपयुक्त अवजारेही पाहता आली. 
- सौ. कल्पना गरड, बाजारठाण, जि. औरंगाबाद

माझी संत्र्याची बाग आहे. त्यासाठी मला रोटाव्हेटर आणि ट्रॅक्टरचलित यंत्रे हवी होती. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे पाहता आली, अगदी फवारणी पंपापासून कोळपणी, बेड, सरी टाकणारी यंत्रे अशी खूप यंत्रे पाहिली. अनेक अवजारे कमी मनुष्यबळात काम करणारी, सर्वाधिक उपयुक्त ठरणारी आहेत. त्यात सवलतीत ती मिळत असल्याने आमच्यासाठी ही पर्वणीच आहे. 
- दशरथराव भीमराव अरबक, चापडगाव, ता. घनसांगवी, जि. जालना

माझी १५ एकर शेती आहे. कांदा, डाळिंब, ढोबळी मिरची उत्पादन घेत असतो. सिंचनासाठी शेततळ्याची सुविधा आहे. आमच्या भागात मजुरांची समस्या आहे. त्यामुळे अन्य ठिकाणाहून मजूर आणावे लागतात. ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशी विविध कृषी अवजारे बघावयास मिळाली. शेततळ्याच्या कापडाबाबत माहिती मिळाली. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनास भेट देणे आवश्यक 
आहे.
- महेंद्र पाटील, उमराणे, ता. देवळा, जि. नाशिक

मी सध्या पारंपरिक पिकेच घेतो आहे. पण, सध्या पाणी आहे म्हणून उसाची लागवड करायची आहे. त्यासाठी ड्रिप आणि पाइपलाइन करायची आहे. प्रदर्शनात त्याची माहिती मिळाली. खूपच उपयुक्त आणि माहितीपूर्ण असे हे प्रदर्शन होते. निश्चितच माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना हे फायदेशीर ठरेल, असेच प्रदर्शन आहे. 
- रघुनाथ शिंदे, विटा, ता. पाथरी, जि. परभणी


इतर इव्हेंट्स
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : अद्ययावत...औरंगाबाद ः ‘‘‘सकाळ-ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या...
नैसर्गिक शेतीची पंचसूत्री अमलात आणा :...औरंगाबाद ः माती, पाणी, जातिवंत बियाणे, पीक नियोजन...
मधमाशीपालन उद्योगात तरुणांना संधी -संजय...औरंगाबाद ः महाराष्ट्रात मधमाशी पालन उद्योगास...
अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनास अलोट गर्दी...औरंगाबाद : २६ लाखांच्या अजस्त्र ‘बॅक हो लोडर’...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : शेतकऱ्यांचा...औरंगाबाद ः माती आणि पाणी परीक्षणाविषयी...
जादा उत्पन्नासाठी शेतमालाचे मूल्यवर्धन...औरंगाबाद ः शेतीमालाच्या उत्पादनामध्ये जितकी काळजी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : पारस, एमव्हीएस...पारस ग्रुपच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी ...
कृषी विद्यापीठाने मांडले एकात्मिक...औरंगाबाद ः प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा...
कृषी विभागाच्या दालनावर योजनांसह कीड-...औरंगाबाद ः कृषी प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेचा...
पायाभूत सुविधा दिल्यास कर्जमाफीची गरज...औरंगाबाद : कर्जमाफी झाली तरी पुढच्या हंगामात...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : यंत्रे, अवजारे...औरंगाबाद ः मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन :शेतकरी गट, बचत...औरंगाबाद ः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : नवे तंत्रज्ञान...सकाळ - ॲग्रोवनच्या वतीने आयोजित भव्य कृषी...
पोपटराव पवार यांच्या हस्ते आज उद्‍घाटन औरंगाबाद: ‘सकाळ ॲग्रोवन’च्या भव्य कृषी...
औरंगाबाद येथे २७ पासून ॲग्रोवन कृषी...पुणे  : शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा...
एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...