agriculture news in marathi, Farmers screwed up the crop insurance scheme in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात पीकविमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

कोल्हापूर : पंतप्रधान पीकविमा योजनेकडे शेतकऱ्यांनी यंदाही पाठ फिरवल्याचे चित्र आहे. जुलैच्या मध्यापर्यंत केवळ ४९ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने या योजनेत सहभागी होतील, ही अपेक्षा फोल ठरली आहे.

कोल्हापूर : पंतप्रधान पीकविमा योजनेकडे शेतकऱ्यांनी यंदाही पाठ फिरवल्याचे चित्र आहे. जुलैच्या मध्यापर्यंत केवळ ४९ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने या योजनेत सहभागी होतील, ही अपेक्षा फोल ठरली आहे.

विम्याच्या निकषात जिल्ह्यातील शेतकरी बसत नसल्याचे चित्र आहे. मुळात जिल्ह्यात खरीप पिकाचे सरासरी उत्पादन अधिक आहे. शासनाने निश्‍चित करून दिलेल्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी उत्पादन येतच नाही. विम्याचा लाभ देण्यापूर्वी मंडलनिहाय दहा पीक कापणीचे प्रयोग घेतले जातात. एका मंडलमध्ये साधारण १० ते १४ गावांचा समावेश होतो. यातील अधिकाधिक गावात उंबरठा उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन झाल्यास कमी उत्पादनाच्या गावांतील शेतकऱ्यांचे उत्पादनही सरासरीपेक्षा जास्त येते. यामुळे खरोखर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही विम्याचा लाभ मिळणे अवघड होते. 

मागील सात वर्षांतील उत्पादन गृहित धरून उंबरठा उत्पादन निश्‍चित केले जाते. यामुळे मंडलनिहाय पीक कापणी प्रयोग जिल्ह्यासाठी तोट्याचा आहे. तोच प्रयोग तलाठी सजानिहाय घेतल्यास खरोखरच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला लाभ मिळू शकतो. कारण, एका सजामध्ये दोन, तीनच गावे समाविष्ट असतात. शासनाने जिल्हानिहाय तेथील भौगोलिक परिस्थिती, पीक अहवाल, पावसाचे प्रमाण याचा अभ्यास करून निकष ठरवणे आवश्‍यक असल्याची मागणी आहे. 

एखादी योजना चांगली असली, तरी ती चुकीच्या निकषामुळे कशी अयशस्वी होते, याचे उत्तम उदाहरण जिल्ह्यातील स्थितीवरून लक्षात येते. वास्तविक अतिपावसाने, पाऊस न पडल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान यापूर्वीही झाले आहे. विमा योजनेचे निकष जिल्ह्यासाठी वेगळे असले असते, तर लाभ मिळण्याची स्थिती वेगळी असती. योजनेमध्ये अनेक त्रुटी असल्याने जिल्ह्याला याचा अपेक्षित लाभ मिळू शकत नसल्याची स्थिती आहे


इतर बातम्या
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
खानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा...जळगाव  : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर...
वाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरजसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी...
खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
खरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचितजळगाव  ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात...
‘सन्मान निधी’च्या लाभासाठी ‘आधार लिंक’...अकोला  ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या...
रत्नागिरी जिल्ह्यात नियोजनाचा आराखडा...रत्नागिरी ः जिल्हा नियोजन समितीचा आराखडा २०१...
नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील चार...नांदेड : इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प,...
निवृत्तीनाथ वारी ठरली ‘निर्मलवारी’नाशिक  : त्र्यंबकेश्‍वर येथे संत निवृत्तीनाथ...
काळवंडलेल्या ज्वारीची हमीभावाने खरेदी...अमरावती  ः जिल्ह्यात पावसामुळे काळवंडलेल्या...
नाशिक येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष...नाशिक  : नाशिक विभागातील सर्वसामान्य जनेतेचे...
व्हिडिओतील छेडछाड भोवली; प्रभारी सहकार...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सापडलेले पाच हजार रुपये शेतकऱ्याने केले...सातारा ः सामाजातील प्रामाणिकपणा हरवत चालला...
नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून...मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या...
सातारा जिल्ह्याच्या विकासात सर्वांनी...सातारा  : चालू आर्थिक वर्षात विविध...
सावकारांकडे गहाण ठेवलेले सोन्याचे...अकोला ः वर्षानुवर्षे सावकारांकडे गहाण पडून असलेले...
हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...
कृषिमंत्री पाठविणार चार हजार सरपंचांना...मुंबई : बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी गाव अधिक...
बाजार समित्यांत शेतकऱ्यांना थेट मतदान...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
अनिल कवडे सहकार; सौरभ राव साखर आयुक्तमुंबई : अरविंद कुमार यांची ग्रामविकास विभागाच्या...