पुणे : कडबा विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग

यंदा पाच एकरांवर ज्वारीची पेरणी केली होती. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ज्वारीची काढणी केली आहे. साधारणपणे एका एकरात ५०० ते ६०० पेंढ्या कडब्याच्या निघतात. मी पाचही एकरातील सुमारे तीन हजार पेंढ्यांची जाग्यावर दुग्ध व्यावसायिकांना प्रति शेकडा २२०० रुपयांनी विक्री केली आहे. - भाऊसाहेब पळसकर, शेतकरी, कर्डे, ता. शिरूर, जि. पुणे
पुणे : कडबा विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग
पुणे : कडबा विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग

पुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चारा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने ज्वारीच्या कडब्याला मागणी वाढली आहे. राज्यातील अनेक भागांत पीक काढणीची कामे संपली आहेत. त्यामुळे वाळलेला कडबा विक्री करण्यास शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. राज्यात ज्वारीचे सुमारे २६ लाख ७८ हजार ५१३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी चालू वर्षी सुमारे १८ लाख ८८ हजार ९९५ हेक्टर म्हणजेच जवळपास ७१ टक्के ज्वारीची पेरणी झाली होती. राज्यात सोलापूर, नगर, बीड, उस्मानाबाद, परभणी ही जिल्हे ज्वारीच्या पेरणीसाठी प्रसिद्ध आहेत. चालू वर्षी या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत बदलत असलेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी गेल्या महिनाभरापासून ज्वारीच्या काढणीस सुरुवात केली आहे.  सध्या राज्यातील अनेक भागांत काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. तर काही ठिकाणी काढणी पूर्ण झाली आहे. या काढणी केलेल्या ज्वारीची कणसे काढून उर्वरित राहिलेला चारा उन्हात वाळवून पेंढ्या बांधणीची कामे पूर्ण झाली आहे. हंगामात बदलत असलेल्या हवामानामुळे ज्वारी पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात झाला. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला.  या रोगामुळे प्रादुर्भावामुळे ज्वारी पिकाच्या पानांवर द्रवरूप असा पातळ चिकट थर निर्माण झाला होता. तसेच ज्वारीच्या पानांचा रंग तांबडा व काळसर होऊन कडब्याची प्रत खराब झाली होती. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याचे शक्यता निर्माण झाली आहे. कडब्याची प्रत काही प्रमाणात ढासळली असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या नुकसान झाल्याचे दिसून येते. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कडब्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळावे म्हणून काही शेतकरी कडबा विकत असल्याचे चित्र असून दुग्ध व्यवसाय करणारे अनेक शेतकरी कडबा खरेदी घेऊन साठवणूक करण्याच्या तयारीला लागले आहेत. दर्जानुसार मिळातायेत दर सध्या उंच पेंढ्याच्या उंचीनुसार पाला अधिक असलेल्या कडब्याचा उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. मोठी पेंढीचा शेकडा भाव २००० ते ३००० हजार रुपये एवढा बाजारभाव मिळत आहे. तर मध्यम ज्वारी कडब्यास शेकडा १५०० ते २००० हजार रुपयांचा बाजारभाव मिळत आहे. त्यातच नगर, पुणे, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, सातारा अशा काही महत्त्वाच्या भागातील कडबा पालेदार व रुचकर आहे. त्यामुळे येथील कडबा अनेक शेतकरी विक्रीसाठी प्राधान्य देत आहेत. साधारणपणे रोज या भागातून ४० ते ५० ट्रॅक्टर बाहेर विक्रीस पाठविले जात आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com