सात खरेदी केंद्रावरील शेतकरी हरभरा खरेदीच्या प्रतीक्षेत 

परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या आणि विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या मिळून ९ खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी १० हजार ६६२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शुक्रवार (ता. ९)पर्यंत पूर्णा येथील आणि मानवत येथील केंद्रावर मिळून एकूण ४० शेतकऱ्यांचा ५७२.५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. अद्याप ७ खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी सुरू नसल्यामुळे नोंदणीकृत शेतकऱ्यांना खरेदी सुरू होण्याची वाट पाहावी लागत आहे.
Farmers at seven shopping centers waiting to buy a gram

खुल्या बाजारातील दर आणि हमीभाव यामध्ये मोठी तफावत असल्याने आहे. त्यामुळे खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हमीभावाने हरभरा विक्रीसाठी राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी येथील केंद्रावर २ हजार ७५२ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली.जिंतूर येथे १ हजार ७७० शेतकऱ्यांनी, पालम येथे १९७ शेतकरी, पाथरी येथे ९४० शेतकऱ्यांनी, सोनपेठ येथे ३३० शेतकऱ्यांनी, बोरी येथे १४६ शेतकऱ्यांनी आणि पूर्णा येथे २ हजार १७७ शेतकऱ्यांनी असे एकूण ८ हजार ३१२ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. 

सेलू येथे नोंदणी झाली नाही. त्यापैकी पूर्णा येथील केंद्रावर २६ शेतकऱ्यांचा ४१९.५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. परभणी येथील खरेदी केंद्रावर तूर पडून आहे. त्यामुळे हरभरा खरेदीसाठी दुसरा गोदाम घेण्यात आला असून मंगळवारी (ता. १२) खरेदी सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. 

विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या मानवत येथील केंद्रावर १ हजार ४०० शेतकऱ्यांनी आणि गंगाखेड येथील केंद्रावर ९५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मानवत येथे खरेदी सुरू झाली असून शनिवार (ता. ९) पर्यंत १४ शेतकऱ्यांचा १५३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. गंगाखेड येथे सोमवार (ता. ११) पासून हरभरा खरेदी सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, खुल्या बाजारामध्ये हमीभावापेक्षा हजार ते दीड हजार रुपये कमी दराने खरेदी करून व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. त्यामुळे तत्काळ खरेदी केंद्र कार्यान्वित करण्याची गरज आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com