Agriculture news in Marathi, Farmers should be careful about spraying pesticides | Agrowon

शेतकऱ्यांनी कीटकनाशके फवारताना काळजी घ्यावी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

गोंडपिपरी, जि. चंद्रपूर ः शेतकरी बांधवांनी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. विषबाधा झाल्यास त्याची लक्षणे ओळखून तातडीने उपचार करावा. तसेच वाटप करण्यात आलेल्या फेरोमोन ट्रॅप ल्यूरचा नियोजनबद्ध वाफर करावा, असे आवाहन गोंडपिपरीचे तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी केले.

गोंडपिपरी, जि. चंद्रपूर ः शेतकरी बांधवांनी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. विषबाधा झाल्यास त्याची लक्षणे ओळखून तातडीने उपचार करावा. तसेच वाटप करण्यात आलेल्या फेरोमोन ट्रॅप ल्यूरचा नियोजनबद्ध वाफर करावा, असे आवाहन गोंडपिपरीचे तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी केले.

गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी केंद्र संचालक संघटना व पंचायत समिती कृषी विभागाच्या माध्यमाने आज पंचायत समिती सभागृहात ‘कीटकनाशक फवारणी करतेवेळी घ्यावयाची काळजी’ यावर कार्यशाळा घेण्यात आली. तसेच फेरोमोन ट्रॅप ल्यूरचे वितरण हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संवर्ग विकास अधिकारी शेषराव बुलकुंडे होते. तर पंचायत समितीचे उपसभापती मनीष वासमवार यांनी कार्यक्रमाचे उद्‍घाटन केले. 

कृषी केंद्र संचालक संघटनेचे अध्यक्ष भारत झाडे, मनोज नरहरशेट्टीवार, कृषी सहायक जी. बी. पाटील, डॉ. प्रशांत पेंदाम, आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. पहिल्या सत्रात पाटील यांनी कापूस सोयाबीन व धान पिकावरील कीड-रोगाची ओळख करणे. त्यावरील उपाययोजना कशी करावी, याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर बिडीओ बुलकुंडे व उपसभापती वासमवार, भारत झाडे, मनोज नरहरशेट्टीवार यांच्या हस्ते उपस्थित शेतकरी बांधवांना फेरोमोन ट्रॅप ल्यूरचे वितरण करण्यात आले. हे साहित्य शेतकरी बांधवाच्या पिकवाढीसाठी कसे उपयुक्त ठरते याबाबतची विस्तृत माहिती देण्यात आली. 

डॉ. प्रशांत पेंदाम यांनी फवारणी करताना विषबाधा झाल्यास त्याची लक्षणे कशी ओळखायची व त्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यासाठी काय करावे. या संदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी बांधंवाना सेप्टी किट देण्यात आल्या. संचालन पंचायत समितीचे कृषी अधिकारी ढवस यांनी केले. विविध विषयांवर घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.


इतर ताज्या घडामोडी
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत केंद्रांवरील...औरंगाबाद : बाजारात हमी दरापेक्षा कमी दराने तुरीची...
ग्रामीण भागात आरोग्यसेवा द्या : भगतसिंह...नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान...
रत्नागिरी दूध संघाकडून १ कोटी २० लाख...रत्नागिरी : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील चाळीस...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगली, कोल्हापूरसाठी विशेष पॅकेज : डॉ...सांगली : ‘‘महापूराने सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे...
वीज दरवाढीबाबत चार फेब्रुवारीला हरकती...मसूर, जि. सातारा ः महावितरणचा २०.४ टक्के वीज...
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचीही...मेढा, जि. सातारा : नियमित कर्जफेड करणाऱ्या...
कुलगुरू डॉ. विलास भाले यांना हरितरत्न...अकोला  ः नवी दिल्ली येथील अखिल भारतीय कृषी...
अकोले तालुका गैरव्यवहार प्रकरणी तीन...नगर ः अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व...
मोहोळ येथे शेतकऱ्यांनी बॅंक...मोहोळ, जि. सोलापूर : अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्‍...
बॅंकांनी रोखली गटशेतीची वाट :...नागपूर  ः गटशेती योजनेचे अनुदान ६०...
हवामान बदल सहनशील वाण संशोधनाला मिळणार...परभणी: बदलत्‍या हवामानात शाश्‍वत उत्‍पादन...
ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीयदिनी...मुंबई ः राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत...
अल्पसंख्यांक समाजामुळे सत्ता परिवर्तन ः...मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मुस्लिम...
शंकरराव चव्हाण यांच्या...नांदेड ः नांदेडचे नगराध्यक्ष ते...