शेतकऱ्यांची कांदा विक्रीत सावध चाल

नाशिक जिल्ह्यात सलग दहा दिवसांनंतर सोमवारी (ता. ५) कांदा लिलाव सुरू झाल्यानंतर २ लाख ४६ हजार क्विंटल आवक झाली. सरासरी आवकेच्या तुलनेत १ लाख क्विंटल अधिक आवक होती.
शेतकऱ्यांची कांदा विक्रीत सावध चाल
शेतकऱ्यांची कांदा विक्रीत सावध चाल

नाशिक : जिल्ह्यात सलग दहा दिवसांनंतर सोमवारी (ता. ५) कांदा लिलाव सुरू झाल्यानंतर २ लाख ४६ हजार क्विंटल आवक झाली. सरासरी आवकेच्या तुलनेत १ लाख क्विंटल अधिक आवक होती. लेट खरीप कांद्याची आवक जास्त तर तुलनेत उन्हाळ कांद्याची आवक कमीच राहिली. त्यामुळे कांदा उत्पादक लेट खरीप लाल कांद्याला प्राधान्य देत असून, उन्हाळ कांदा रोखून ठेवला जात आहे. त्यामुळे शेतकरी सध्या कांदा विक्रीचा अंदाज घेऊन सावध चाल करत असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने दरात घसरण होऊन शेतकऱ्यांना फटका बसला. लासलगाव सारख्या बाजाराची दैनंदिन आवक क्षमता २० ते २४ हजार क्विंटल आहे. मात्र येथे ३५ हजार क्विंटलच्या जवळपास आवक राहिली. सर्वच बाजार समित्यांमध्ये सरासरी १५० ते २०० रुपयांपर्यंत क्विंटलमागे दर कमी निघाले. त्यामुळे जिल्हाभरात कांद्याच्या विक्रीत साडेतीन कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

लासलगाव, उमराणे, विंचूर उपबाजार, देवळा, नांदगाव येथे लेट खरीप कांद्याची आवक अधिक, तर उन्हाळ कांद्याची आवक कमी राहिली. तर पिंपळगाव बसवंत, सटाणा, कळवण, सिन्नर येथे लेट खरीप कांद्याची आवक कमी तर उन्हाळची जास्त होती. एकीकडे विविध आपत्तीमुळे उत्पादक अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे बाजारात मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. त्यामुळे कांदा उत्पादक आता बाजाराचा अंदाज घेऊन विक्री करत आहे. तर लेट खरीप कांदा विक्रीस प्राधान्य तर साठवणयोग्य उन्हाळ कांदा रोखण्यासाठी शेतकरी आता पाऊल टाकत आहेत.

उन्हाळ कांदा साठवण्यावर भर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट त्यात उशिराच्या लागवडी यामुळे उत्पादन घटले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुढे पुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे ज्यांचा कांदा टिकायला दर्जेदार आहे, असे शेतकरी साठवणूक क्षमतेनुसार कांदा साठवून ठेवण्यासाठी आग्रही आहेत, असे दिसून येत आहे.

जिल्हाभरात आवेकची स्थिती (क्विंटलमध्ये)

  •      लेट खरीप लाल कांदा...१,३२,८५३
  •   उन्हाळ...१,०८,६४६
  •   एकूण...२,४१,४९९
  • प्रतिक्रिया

    एक बाजूला बाजार सुरू झाल्यानंतर आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे दरात घसरण आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कडक निर्बंध असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अडचणी आहेत. मात्र लाल कांदा अधिक येत आहे तर उन्हाळ कमीच आहे. - नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती 

    प्रतिक्रिया

    सावध पवित्रा घेऊन चांगला माल रोखून न टिकणारा माल विकणार आहोत. लूट भावात विकण्यापेक्षा थांबलेलं कधीही बरे ठरणार आहे. सध्या त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करत आहोत. - संदीप कोकाटे, कांदा उत्पादक, साताळी, ता. येवला

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com