Agriculture news in marathi Farmers should be careful in selling onions | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांची कांदा विक्रीत सावध चाल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 एप्रिल 2021

नाशिक जिल्ह्यात सलग दहा दिवसांनंतर सोमवारी (ता. ५) कांदा लिलाव सुरू झाल्यानंतर २ लाख ४६ हजार क्विंटल आवक झाली. सरासरी आवकेच्या तुलनेत १ लाख क्विंटल अधिक आवक होती. 

नाशिक : जिल्ह्यात सलग दहा दिवसांनंतर सोमवारी (ता. ५) कांदा लिलाव सुरू झाल्यानंतर २ लाख ४६ हजार क्विंटल आवक झाली. सरासरी आवकेच्या तुलनेत १ लाख क्विंटल अधिक आवक होती. लेट खरीप कांद्याची आवक जास्त तर तुलनेत उन्हाळ कांद्याची आवक कमीच राहिली. त्यामुळे कांदा उत्पादक लेट खरीप लाल कांद्याला प्राधान्य देत असून, उन्हाळ कांदा रोखून ठेवला जात आहे. त्यामुळे शेतकरी सध्या कांदा विक्रीचा अंदाज घेऊन सावध चाल करत असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने दरात घसरण होऊन शेतकऱ्यांना फटका बसला. लासलगाव सारख्या बाजाराची दैनंदिन आवक क्षमता २० ते २४ हजार क्विंटल आहे. मात्र येथे ३५ हजार क्विंटलच्या जवळपास आवक राहिली. सर्वच बाजार समित्यांमध्ये सरासरी १५० ते २०० रुपयांपर्यंत क्विंटलमागे दर कमी निघाले. त्यामुळे जिल्हाभरात कांद्याच्या विक्रीत साडेतीन कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

लासलगाव, उमराणे, विंचूर उपबाजार, देवळा, नांदगाव येथे लेट खरीप कांद्याची आवक अधिक, तर उन्हाळ कांद्याची आवक कमी राहिली. तर पिंपळगाव बसवंत, सटाणा, कळवण, सिन्नर येथे लेट खरीप कांद्याची आवक कमी तर उन्हाळची जास्त होती. एकीकडे विविध आपत्तीमुळे उत्पादक अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे बाजारात मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. त्यामुळे कांदा उत्पादक आता बाजाराचा अंदाज घेऊन विक्री करत आहे. तर लेट खरीप कांदा विक्रीस प्राधान्य तर साठवणयोग्य उन्हाळ कांदा रोखण्यासाठी शेतकरी आता पाऊल टाकत आहेत.

उन्हाळ कांदा साठवण्यावर भर
जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट त्यात उशिराच्या लागवडी यामुळे उत्पादन घटले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुढे पुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे ज्यांचा कांदा टिकायला दर्जेदार आहे, असे शेतकरी साठवणूक क्षमतेनुसार कांदा साठवून ठेवण्यासाठी आग्रही आहेत, असे दिसून येत आहे.

जिल्हाभरात आवेकची स्थिती (क्विंटलमध्ये)

  •     लेट खरीप लाल कांदा...१,३२,८५३
  •   उन्हाळ...१,०८,६४६
  •   एकूण...२,४१,४९९

प्रतिक्रिया

एक बाजूला बाजार सुरू झाल्यानंतर आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे दरात घसरण आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कडक निर्बंध असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अडचणी आहेत. मात्र लाल कांदा अधिक येत आहे तर उन्हाळ कमीच आहे.
- नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती 

प्रतिक्रिया

सावध पवित्रा घेऊन चांगला माल रोखून न टिकणारा माल विकणार आहोत. लूट भावात विकण्यापेक्षा थांबलेलं कधीही बरे ठरणार आहे. सध्या त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करत आहोत.
- संदीप कोकाटे, कांदा उत्पादक, साताळी, ता. येवला

 


इतर अॅग्रो विशेष
‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी...पुणे ः राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर...
साहेब, टरबूज विक्रीला परवानगी द्या अकोला ः दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
अन्न प्रक्रियेमध्ये अवरक्त किरणांचा वापरअन्न प्रक्रियेदरम्यान पारंपरिक उष्णतेच्या...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...