शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच २५ टक्‍के विमा परतावा

२३ जिल्ह्यांतील ३९ लाख ९४ हजार २८२ शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीतील तरतुदीनुसार २५ टक्‍के विमा संरक्षित रक्‍कम आगाऊ दिली जाणार आहे.
Farmers should be reimbursed 25% before Diwali
Farmers should be reimbursed 25% before Diwali

नागपूर ः या वर्षी जुलै महिन्यात पावसाचा खंड पडल्याने पिकाची उत्पादकता कमी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर २३ जिल्ह्यांतील ३९ लाख ९४ हजार २८२ शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीतील तरतुदीनुसार २५ टक्‍के विमा संरक्षित रक्‍कम आगाऊ दिली जाणार आहे. दिवाळीपूर्वी ही रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यासाठीचा राज्याचा ९७० कोटी रुपयांचा हिस्सादेखील भारतीय कृषी विमा कंपनीला वितरित करण्यात आला आहे.

वातावरणातील बदलाचा यंदाच्या खरीप पिकांना मोठा फटका बसला. हंगामाच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्या भरवशावर लागवडकर्त्या शेतकऱ्यांनी नंतर पावसाचा मोठा खंड अनुभवला. जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. 

परिणामी, सरासरी उत्पादनात ५० टक्‍क्यांपेक्षा जास्त घट नजरअंदाजाने दिसते. त्या संदर्भातील नोटिफिकेशन जिल्हाधिकाऱ्यांकडून काढले जाते. त्या पार्श्‍वभूमीवर नुकसानीच्या २५ टक्‍के ॲडव्हान्स रक्‍कम देण्याची तरतूद आहे. पीक कापणी प्रयोगाअंती अंतिम भरपाईचा निर्णय घेतला जातो. आगाऊ दिलेल्या रकमेच्या तुलनेत नुकसान जास्त असेल तर डिफरन्स देण्याची तरतूद आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती जाहीर झाल्यानंतर एक महिन्याच्या आत ही रक्‍कम देण्याचा निकष आहे. त्यानुसार, २३ जिल्ह्यांतील १६८२ महसूल मंडलांतील ३९ लाख ९४ हजार २८२ शेतकऱ्यांना आगाऊ २५ टक्‍के रक्‍कम मिळणार आहे. या शेतकऱ्यांनी २७०८५१६.०९ हेक्‍टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ही रक्‍कम जमा व्हावी याकरिता कृषी विभाग प्रयत्नशील आहे. त्याच कारणामुळे २९ तारखेला राज्य सरकारने भरपाईबाबत अधिसूचना काढल्यानंतर राज्याच्या हिस्सा म्हणून ९७० कोटी रुपये भारतीय कृषी विमा कंपनीच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. 

भारतीय कृषी विमा कंपनी ही केंद्र सरकारने नियुक्‍त केलेली नोडल एजन्सी आहे. त्यांच्याद्वारे संबंधित जिल्ह्यात विमा योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या कंपनीच्या खात्यात विमा रक्‍कम टाकली जाते. राज्याच्या हिस्सा जमा झाल्यानंतर केंद्र सरकारदेखील आपला हिस्सा रिलीज करतो. त्यामुळे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना विमाभरपाई मिळण्याची शक्‍यता आहे. 

या पिकांना मिळणार २५ टक्‍के विमाभरपाई  रायगड ः भात  पालघर ः भात  सांगली ः सोयाबीन  परभणी ः सोयाबीन  कोल्हापूर ः सोयाबीन, भुईमूग जालना ः सोयाबीन  गोंदिया ः भात लातूर ः सोयाबीन  अमरावती ः सोयाबीन  सोलापूर ः सोयाबीन, भुईमूग  धुळे ः उडीद, ज्वारी,बाजरी, मुग  हिंगोली ः सोयाबीन, उडीद  पुणे ः बाजरी, भुईमूग, तूर, सोयाबीन  औरंगाबाद ः सोयाबीन, मका, कापूस  बुलडाणा ः कापूस, मका, सोयाबीन  नंदुरबार ः कापूस, भात, सोयाबीन  जळगाव ः मूग, उडीद, बाजरी, कापूस बीड ः सोयाबीन, मूग, उडीद  नाशिक ः सोयाबीन, मका, भुईमूग, बाजरी, कापूस, भात, नाचणी, कारळ  नगर ः सोयाबीन, बाजरी, भुईमूग, कापूस अकोला ः मूग, सोयाबीन, उडीद, तूर, कापूस   उस्मानाबाद ः सोयाबीन, मका, उडीद, बाजरी, तूर, कापूस  नांदेड ः कापूस, तूर, खरीप ज्वारी  भात  सांगली ः सोयाबीन  परभणी ः सोयाबीन  कोल्हापूर ः सोयाबीन, भुईमूग जालना ः सोयाबीन  गोंदिया ः भात लातूर ः सोयाबीन  अमरावती ः सोयाबीन  सोलापूर ः सोयाबीन, भुईमूग  धुळे ः उडीद, ज्वारी,बाजरी, मुग  हिंगोली ः सोयाबीन, उडीद  पुणे ः बाजरी, भुईमूग, तूर, सोयाबीन  औरंगाबाद ः सोयाबीन, मका, कापूस  बुलडाणा ः कापूस, मका, सोयाबीन  नंदुरबार ः कापूस, भात, सोयाबीन  जळगाव ः मूग, उडीद, बाजरी, कापूस बीड ः सोयाबीन, मूग, उडीद  नाशिक ः सोयाबीन, मका, भुईमूग, बाजरी, कापूस, भात, नाचणी, कारळ  नगर ः सोयाबीन, बाजरी, भुईमूग, कापूस अकोला ः मूग, सोयाबीन, उडीद, तूर, कापूस   उस्मानाबाद ः सोयाबीन, मका, उडीद, बाजरी, तूर, कापूस  नांदेड ः कापूस, तूर, खरीप ज्वारी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com