Agriculture news in marathi Farmers should come forward for silk industry: MLA Pawar | Agrowon

रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे : आमदार पवार

टीम अॅग्रोवन
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे व्यावसायिक पद्धतीने पाहिले, तर हे पीक महिन्याला लाख रुपयांचे उत्पन्न देऊ शकते. त्यामुळे औसा हे रेशीम उद्योगाचे हब म्हणून देशात ओळखले जावे. शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले, तर ते आर्थिक विवंचनेतून बाहेर पडतील. म्हणून शेतकऱ्यांनी पुढे यावे’’, असे मत आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले.

औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे व्यावसायिक पद्धतीने पाहिले, तर हे पीक महिन्याला लाख रुपयांचे उत्पन्न देऊ शकते. त्यामुळे औसा हे रेशीम उद्योगाचे हब म्हणून देशात ओळखले जावे. शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले, तर ते आर्थिक विवंचनेतून बाहेर पडतील. म्हणून शेतकऱ्यांनी पुढे यावे’’, असे मत आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील शेतकऱ्यांना ठोस उत्पादन मिळावे म्हणून येथील विजय मंगल कार्यालयात क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे आयोजित रेशीम परिषदेचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. २१) आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्‌घाटनाला रेशीमचे उपसंचालक डी. के. हाके, रेशीम तज्ज्ञ डॉ. एल. जी. कलंत्री, डॉ. अधिकराव जाधव, चॉकी तज्ज्ञ विजय पाटील, हेमंत पाटील, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे देशमुख, तहसीलदार शोभा पुजारी, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संतोष मुक्ता आदी उपस्थित होते. 

या रेशीम परिषदेद्वारे रेशीम उद्योगातील अडचणी, संधी आणि विक्री यावर सखोल आणि तंत्रशुद्ध माहिती मिळावी. पारंपरिक शेतीत बदल घडावा, यातून शेतकरी आर्थिक सक्षम व्हावा हा हेतू आहे. 

पवार म्हणाले, ‘‘तालुक्यातील शेतकरी उसासारखी जास्त पाणी लागणारी आणि बेभरवशाची शेती करून आर्थिक संकटात सापडला आहे. उसासारख्या पिकाला रेशीम उद्योग हा चांगला पर्याय असल्याने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले. रेशीम शेतीचा सखोल अभ्यास केला. वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यामधील अडचणी समजून घेतल्यावर यामध्ये मोठा फायदा दिसून आला.’’

‘‘गावोगावी रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. त्याचा परिणाम म्हणून आधी ऊस उत्पादक त्यानंतर ते सोयाबीन उत्पादक बनलेला शेतकरी आता तुती लागवड करून रेशीम उद्योगाकडे वळत आहे. शासनाच्या सर्व योजना, अनुदान मिळण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहोत,’’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.

अर्थात केवळ अनुदान भेटत आहे म्हणून या रेशीम शेतीकडे वळू नका, तर यातून आर्थिक उन्नतीसाठी शेती करा, असा सल्लाही त्यांनी दिला.


इतर ताज्या घडामोडी
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...
चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके,...चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व...
बंदीवानांनी पिकवला भाजीपालाअकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत...
नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल...नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे...औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे...
अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्याअकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात...
अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन...अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक...
वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य...
लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा...
हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले...वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍...
नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले...देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली...नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या...
पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून...पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या...
इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळपुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू...
`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी...