Agriculture news in Marathi Farmers should get loan waiver: Raju Shetty | Agrowon

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी : राजू शेट्टी 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 जानेवारी 2020

बुलडाणा ः महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. त्यामध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या संदर्भात स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नागपूर येथे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. 

या संदर्भात विधानभवनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन या वेळी नाना पटोले यांनी दिले.

बुलडाणा ः महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. त्यामध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या संदर्भात स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नागपूर येथे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. 

या संदर्भात विधानभवनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन या वेळी नाना पटोले यांनी दिले.

दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. २०१५ नंतरच्या थकीत शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांचीही कर्जमाफी करणे आवश्यक आहे. सत्तेत सहभागी असलेल्या तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द पाळत सातबारा कोरा करावा. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही सकारात्मक विचार झाला पाहिजे, अशी मागणी या वेळी शेट्टी आणि तुपकर यांनी नाना पटोले यांच्याकडे केली.

विदर्भातील मागील दोन वर्षांपासून दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे शेतकरी आत्महत्या अधिक आहेत. त्यासाठी विदर्भातील सगळ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे आवश्यक आहे. मात्र, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळणे शक्य नाही, ही बाब देखील यावेळी तुपकरांनी नाना पटोले यांच्या निदर्शनास आणून दिली.

शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. मात्र, ही कर्जमाफी तोकडी असून समाधानकारक नसल्याने सदर कर्जमाफी मान्य नाही. 
— राजू शेट्टी, 
स्वाभिमानी शेतकरी संघटना


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...