दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे विक्री करू नये

दर वाढले म्हणून बियाण्यासाठी राखून ठेवलेले सोयाबीन विक्री करू नये, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे विक्री करू नये Farmers should not sell soybean seeds as prices have gone up
दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे विक्री करू नये Farmers should not sell soybean seeds as prices have gone up

परभणी : दर वाढले म्हणून बियाण्यासाठी राखून ठेवलेले सोयाबीन विक्री करू नये, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

परभणी जिल्ह्यात सध्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर प्रती क्विंटल जवळपास ६ हजार रुपये असल्याने बरेच शेतकरी बाजारामध्ये त्यांच्याकडील राखीव असलेले सोयाबीन विक्री करत आहेत. परंतु येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणांचे दर हे ८० ते ९० रुपये प्रति किलो किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी राखीव असलेले गुणवत्तापूर्ण घरचे सोयाबीन बियाणे बाजारामध्ये विक्री करू नये व ते बियाणे येणाऱ्या खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी वापरावे.

खरीप हंगाम २०२१च्या पेरणीच्या अनुषंगाने घरचे सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याबाबत कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियाणे राखीव ठेवले आहे. तसेच जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामामध्ये सोयाबीन बियाणे उत्पादनासाठी  उन्हाळी सोयाबीन लागवड केली आहे. असे आळसे यांनी सांगितले.

खत विक्रेत्यांनी जुना खताचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रासायनिक खताच्या बॅगची खरेदी करताना बॅगवरील किंमत व खत विक्रेत्याने बिलावर लावलेली किंमत, दर याची पडताळणी करूनच बॅगवरील किमतीपेक्षा जास्तीच्या दराने खताची खरेदी करू नये. खत विक्रेत्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेला जुन्या दरातील रासायनिक खताचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केले आहे.

सध्या खरीप हंगाम २०२१चे पूर्व नियोजन व उन्हाळी हंगाम पिके, ऊस या पिकांना रासायनिक खताची मात्रा देण्यासाठी शेतकरी खत खरेदी करत आहेत. सध्या डीएपी १०:२६:२६, २०:२०:००:१३,  १६:१६:१६ आदि रासायनिक खताच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com